Shilpa Shetty - Raj Kundra  Dainik Gomantak
मनोरंजन

राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी जोडीने एकमेकांचा हात सोडला? पोस्ट शेअर करत म्हणाले

Shilpa Shetty - Raj Kundra Split: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी एकमेकांचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul sadolikar

Shilpa Shetty - Raj Kundra Split: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं.

पण तरीही दोघे एकमेकांसोबत राहत होते. पॉर्न फिल्ममध्ये अडकल्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या राज कुंंद्राचे पत्नी शिल्पा शेट्टीसोबत मतभेद झाले होते.

आपल्या पतीने केलेल्या गुन्ह्याविषयी आपणाला कल्पनाच नाही असंही शिल्पाने कोर्टात सांगितलं होतं. आता समोर आलेल्या वृत्ताने शिल्पा आणि राज कुंंद्राच्या नात्याला घरघर लागल्याचे स्पष्टच झाले आहे.

राज कुंद्रावरचा आरोप

शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्रा चर्चेत राहण्याचा हा ट्रेंड अॅडल्ट फिल्म बनवण्यापासून सुरू झाला.

यानंतर राज तुरुंगात गेला, जामिनावर बाहेर आला, मुखवटा घालून फिरू लागला, त्यानंतर त्याने स्टँडअप कॉमेडीही केली. 

आता राज त्याच्या आगामी 'UT 69' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा प्रसिद्ध ट्रेलर काल प्रदर्शित झाला. त्याचवेळी, आता राजची एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने काहीतरी धक्कादायक लिहून सर्वांना थक्क केले आहे. 

राज कुंद्राची पोस्ट

रात्री उशिरा, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम आणि एक्स हँडलवर विभक्त होण्याबद्दल एक धक्कादायक पोस्ट शेअर केली.

पत्नी शिल्पाचे नाव न घेता राज यांनी लिहिले की, 'आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण काळात आम्हाला वेळ द्यावा ही नम्र विनंती.' 

राजची ही पोस्ट समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, ती पाहून लोक थक्क झाले आहेत. अनेकांनी या पोस्टबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तर अनेकांनी ते साफ नाकारले आहे.

राज कुंद्राला अटक आणि चित्रपटाची गोष्ट

राज कुंद्राची ही पोस्ट पाहून काही लोकांनी याला 'UT 69' साठी मार्केटिंग गिमिक म्हटले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. 'UT 69' बद्दल बोलायचे तर राज कुंद्राच्या आर्थर रोड जेलमध्ये घालवलेल्या दिवसांची कहाणी यात दाखवण्यात आली आहे.

राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये प्रौढ चित्रपट बनवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. सर्व प्रयत्न करूनही त्याला जामीन मिळण्यास दोन महिने लागले. 

'UT 69' बनवण्याबाबत, राज कुंद्रा ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये म्हणाले, 'आर्थर रोडमध्ये घालवलेल्या 63 दिवसांच्या माझ्या अनुभवांबद्दल मी दररोज लिहित राहिलो. त्यावर मला पुस्तक लिहायचे होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी शाहनवाज अली यांची भेट घेतली आणि त्यांना मी लिहिलेल्या नोट्स वाचायला दिल्या. 

ते मला पुन्हा भेटायला आले तेव्हा त्यांनी लिहिलेली संपूर्ण स्क्रिप्ट घेऊन आली आणि त्यावर चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले. राज कुंद्राचा 'UT 69' चित्रपट 3 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर या दोघांनी नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केले. अशा प्रकारे या जोडप्याच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण होणार आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत, एक मुलगा विआन आणि मुलगी समिशा. 

चाहत्यांनी या सुंदर कुटुंबावर मनापासून प्रेमाचा वर्षाव केला. मात्र, राज कुंद्राच्या ताज्या पोस्टने चाहते संभ्रमात पडले आहेत. 

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT