Raj Kundra Premanand Maharaj request Dainik Gomantak
मनोरंजन

Raj Kundra: ''माझी एक किडनी घ्या'' राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना केली भलतीच विनंती; नेटकऱ्यांकडून झाली जोरदार टीका

Raj Kundra social media criticism: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा प्रेमानंद जी महाराज यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे सध्या चर्चेत आहे

Akshata Chhatre

Raj Kundra kidney offer to Premanand Maharaj: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा प्रेमानंद जी महाराज यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे सध्या चर्चेत आहे. वृंदावन येथे महाराज आणि राज कुंद्रा यांच्या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. अनेकांनी त्याला 'पब्लिसिटी स्टंट' म्हणत ट्रोल केले होते. यावर आता राज कुंद्राने ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

१४ ऑगस्ट रोजी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा प्रेमानंद जी महाराजांच्या दर्शनासाठी वृंदावन येथील केली कुंज आश्रमात पोहोचले होते. यावेळी झालेल्या चर्चेत राज कुंद्रा यांनी महाराजांना सांगितले की, 'महाराज, माझी इच्छा आहे की तुम्ही माझी एक किडनी घ्यावी. तुम्हाला जो त्रास होत आहे, तो मला माहिती आहे. जर मी तुमच्या कामी येऊ शकलो, तर माझी एक किडनी तुमच्या नावे.' राज कुंद्रा यांचे हे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टीही काही क्षणांसाठी थक्क झाली. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'पब्लिसिटी स्टंट'च्या नावाखाली राज कुंद्रा यांना ट्रोल करण्यात आले.

राज कुंद्रा यांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर सुरू असलेल्या या टीकेला राज कुंद्रा यांनी आता ट्विटरवर (X अकाउंट) उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले की, "आपण एका विचित्र जगात जगतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा एक भाग दान करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिची 'पीआर स्टंट' म्हणून खिल्ली उडवली जाते.

जर करुणा हा एक स्टंट असेल, तर जगाने असे स्टंट अधिक पाहावेत. जर माणुसकी ही एक रणनीती असेल, तर अधिकाधिक लोकांनी ती अवलंबली पाहिजे." राज कुंद्रा यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरही अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT