Pushpa The Rule Collection Worldwide Dainik Gomantak
मनोरंजन

Pushpa 2 Box Office Collection: "वाइल्ड फायर पुष्पा को फ्लॉवर समझे क्या"? केवळ 48 तासांत 400 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय चित्रपट

Pushpa 2 Collection Worldwide: चित्रपटाने पहिल्या दिवशी २८२.९ कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी १३४.६ कोटी रुपयांची कमाई केली

Akshata Chhatre

Pushpa 2 Box Office Collection Worldwide

"पुष्पा समझके फ्लॉवर समझे क्या? पुष्पा फायर नाही, वाइल्ड फायर हैं!" संपूर्ण देशभराला वाइल्ड फायर पुष्पाने वेड लावलंय. गुरुवारी (दि. ५ डिसेंबर) ला पुष्पाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा-द रुल प्रदर्शित झाला. दक्षिण चित्रपट सृष्टीतील आयकॉनिक स्टार म्हणून ओळखला जाणारा अल्लू अर्जुन यात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळतोय, शिवाय रश्मीका मंधाना आणि फहाद फासील यांच्या अभिनयामुळे प्रेक्षक चित्रपट गृहांमध्ये गर्दी करतायत.

पुष्पा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा सर्व भाषांमध्ये पुष्पराजला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. पहिल्या दिवशी १७५ कोटी रुपयांची धमाकेदार कमाई केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ९०.१ रुपये कमावले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दोन दिवसांत पुष्पाने २६५ रुपयांची भरगोस कमाई केली.

एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या या सिनेमाने दुसऱ्या दिवशी तेलुगूमधून २७.१ कोटी, हिंदीमधून ५५ कोटी, तमिळमधून ५.५ कोटी, मल्याळममधून १.९ कोटी आणि कन्नडमधून ६० लाख रुपये कमावले.

पुष्पा २ ने केवळ दोन दिवसांत जगभरात ४१७.५ कोटी रुपयांची कमाई करून इतिहास रचला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी २८२.९ कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी १३४.६ कोटी रुपयांची कमाई केली, पुष्पा हा सिनेमा केवळ ४८ तासांत ४०० कोटी रुपये पार करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT