Shashi Tharur Dainik Gomantak
मनोरंजन

Shashi Tharoor : 32,000 मुलींच्या धर्मांतराचा दावा सिद्ध करा अन् एक कोटी जिंका...शशी थरुरनी 'द केरला स्टोरी'ला दिलं आव्हान

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटाला आव्हान दिले आहे

Rahul sadolikar

'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा वाद रिलीजआधीच सुरू झाला आहे. आता ही गोष्ट केरळमध्ये 32 हजार हिंदु मुलींच्या धर्मांतराचा दावा करते आता याच गोष्टीवर वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या चित्रपटाला आव्हान दिले आहे आणि नुसते आव्हान नाही तर यासाठी ते 1 कोटी रुपयेही द्यायला तयार आहेत.चला काय आहे हे एक कोटींचं आव्हान..

. 'द केरला स्टोरी'च्या ट्रेलरने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे. केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकीय विश्वातही या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु झाली. हा चित्रपट रिलीजपुर्वीच वादात अडकला आहे.

या चित्रपटाची गोष्ट केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांमागील सत्य घटनेवर आधारित असून, 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर प्रभावी आणि सत्य कथेवर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.

केरळमधील गैर-मुस्लिम मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांच्या तावडीत सापडल्याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यातील मात्र, 32 हजारांच्या आकड्याबाबत गदारोळ सुरू झाला आहे.

काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी रविवारी 'द केरळ स्टोरी' चित्रपटाबाबत ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली होती. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्यांनी चित्रपटावर टीका केली. शशी थरूर यांनी ट्विट केले की, "ही 'तुमची' केरळ स्टोरी असू शकते. ही 'आमची' केरळ स्टोरी नाही.

आता पुन्हा शशी थरुर यांनी ट्विट केले आहे. यासोबतच त्याने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये 32 हजार मुलींचे धर्मांतर करून सीरियाला जाणं हे सिद्ध करा असे लिहिलं आहे. तुम्ही पुरावे सादर करा. असं म्हणत हे आव्हान पूर्ण करणाऱ्याला त्यांनी एक कोटी रुपयांचे आश्वासन देण्यात आले आहे.

आपल्या ट्विटमध्ये शशी थरूर यांनी लिहिले आहे की, “जे लोक केरळमध्ये 32,000 मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, त्या लोकांसाठी केस सिद्ध करण्याची आणि पैसे कमावण्याची मोठी संधी आहे.

की ते या आव्हानाला सामोरे जातील का किंवा कोणतेही पुरावे नाहीत कारण कोणतेही अस्तित्वात नाही? असं म्हणत शशी थरूर यांनी पोस्टमध्ये 'नॉट अ केरळ स्टोरी' असा हॅशटॅग दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT