Priyanka Chopra In Met Gala
Priyanka Chopra In Met Gala Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka Chopra In Met Gala : काय सांगता प्रियांका चोप्राने घातला चक्क 200 कोटींचा नेकलेस...

Rahul sadolikar

Met Gala 2023 : मेट गाला 2023 सुरू झाला आहे आणि जगभरातील सितारे रेड कार्पेटवर त्यांच्या फॅशनचा जलवा दाखवण्यास अगदी तयार आहेत. ग्लोबल स्टार, हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा देखील तिचा पती निक जोनाससोबत मेट गालामध्ये पोहोचली आणि दोघांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी फॅशन नाईटची थीम 'कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी' आहे, ही होऊन गेलेल्या प्रसिद्ध डिझायनरचा अविस्मरणीय क्षणांच्या स्मरणार्थ असणार आहे. प्रियांकाच्या स्लिट गाऊनने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, तर तिच्या जबरदस्त डायमंड नेकलेसची खासियत अन् लूक बघून तुमची झोप उडू शकते.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी यावेळी मेट गाला 2023 साठी काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे ट्यूनिंग केलेले दिसतेय, हा लूक त्यांनी लक्झरी फॅशन हाउस व्हॅलेंटिनोमधून निवडलाय. या लव्ह बर्ड्सचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियांकाने परिधान केलेल्या हाय स्लिट गाऊनने व निकच्या क्लासी सूटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रियांकाच्या या गाऊनला प्लंजिंग स्क्वेअर नेकलाइन दिली गेली होती. ज्याला एक प्रकारे ऑफ शोल्डर पॅटर्नसुद्धा म्हटलं जाऊ शकतं. तर वेस्ट साइडला एका बाजूने बो लाइन डिझाइन दिलेली आहे. तिच्या या गाऊनमध्ये प्रियंका तिची कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसतेय.

प्रियंकाच्या संपूर्ण लुकमध्ये सर्वात आकर्षक ठरलं ते तिचं डायमंड नेकलेस. हे डायमंड नेकलेस 11.6 कॅरेटचं आहे. हे नेकलेस तिने बुलगारी ब्रँडकडून पिक केलंय. या नेकलेसमध्ये फार महागडा हिरा जडलेला आहे. रिपोर्ट्सनुसार या नेकलेसची किंमत 25 मिलीयन डॉलर आहे. भारतीय किंमतीनुसार हे नेकलेस तब्बल 204 कोटींचं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT