बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रियांका ही जागतिक सेलिब्रिटी आहे. बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तिने आपले स्थान निर्माण केले आहे. 2000 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर प्रियंका चित्रपटांकडे वळली. 2002 मध्ये आलेल्या 'थामिजान' या तमिळ चित्रपटातून तिने ग्लॅमरस दुनियेत पदार्पण केले. यानंतर ती 'द हिरो' या स्पाय थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली. हा चित्रपट 2003 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर प्रियंका 'अंदाज' या चित्रपटात दिसली, ज्यासाठी तिला 2004 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. (Priyanka Chopra Birthday news)
* 'ऐतराज' चित्रपटातून नशीब बदलले
2004 मध्ये 'मुझसे शादी करोगी' सारख्या रोमँटिक कॉमेडीमध्ये चित्रपटामध्ये काम केल्यानंतर प्रियांका 'ऐतराज' चित्रपटात दिसली. या चित्रपटात प्रियंका नकारात्मक भूमिकेत दिसली आणि या भूमिकेने तिच्या करिअरला उंचीवर नेले. प्रियांकाला नकारात्मक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2005 हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात व्यस्त वर्ष होते. यादरम्यान, वक्त आणि ब्लफमास्टर सारख्या चित्रपटांसह तिचे सहा चित्रपट रिलीज झाले. 2006 मध्ये प्रियंका 'क्रिश' आणि 'डॉन' सारख्या दोन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांचा (Movie) भाग होती.
* 'फॅशन' हा टर्निंग पॉइंट ठरला
प्रियांकाने 2007 आणि 2008 मध्येही अपयशाला सामोरे गेली, तिचे 'सलाम-ए-इश्क', 'लव्ह स्टोरी 2050' आणि 'द्रोणा' हे चित्रपट फ्लॉप ठरले. पण 2008 मध्ये आलेला 'फॅशन' (Fashion) हा चित्रपट प्रियांकासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती बॉलिवूडमधील (Bollywood) टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. प्रियांकाला तिच्या फॅशनमधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. यानंतर प्रियांकाने 'डॉन 2', 'अग्निपथ', 'बर्फी', 'क्रिश 3', 'मेरी कॉम' सारख्या चित्रपटात काम केले.
* 'क्वांटिको'ने हॉलिवूडचे दरवाजे उघडले
2015 मध्ये प्रियांका पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. जेव्हा ती अमेरिकन मालिका क्वांटिकोचा भाग बनली . या मालिकेत अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये (Hollywood) पदार्पण केले. तेव्हापासून, ती बेवॉच (2017), अ किड लाइक जेक (2018) आणि इजंट इट रोमँटिक (2019), द मॅट्रिक्स रिसरेक्शन यांसारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. जरी हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतरही प्रियांकाचे बॉलिवूडमधील आकर्षण संपले नाही. बाजीराव मस्तानीमधील काशीबाईच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
* आगामी चित्रपट
2019 मधील 'द स्काय इज पिंक' हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. प्रियांका 'जी ले जरा' बॉलिवूड चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसह दिसणार आहे. इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर प्रियांकाने नुकतेच 'टेक्स्ट फॉर यू' आणि 'सिटाडेल' या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.