Priyanka Chopra Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanaka Chopra: देसी गर्ल 'या' पोस्टमुळे पून्हा चर्चेत; आईला म्हणाली- आपलं कुटुंब...

Priyanaka Chopra: फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' मध्ये कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

Priyanaka Chopra: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीने हॉलीवूडमध्येदेखील आपला चांगलाच जम बसवला आहे. प्रियंका फक्त चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असलेली दिसून येते.

आता प्रियंकाच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगताना दिसत आहे. तिने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंकाची आई डॉ. मधू यांच्यासोबतच त्यांचे दिवंगत पती अशोक चोप्रा, प्रियंका चोप्रा, निक जॉनस आणि छोटी मालती देखील दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने मधू यांच्या मागच्या काही दशकातल्या आठवणी जाग्या केल्या आहेत.

'प्रेम कधीकधी आयुष्यापेक्षा मोठे बनते , तर कधी प्रेमच आयुष्य बनते ' मधू यांच्या या वाक्याने हा व्हिडिओ सुरु होतो. त्यांचे पती अशोक चोप्रा यांचे निधन झाल्यानंतर प्रियंका आणि सिद्धार्थ चोप्राबरोबरचे आय़ुष्य कसे होते हे दर्शवणारे हे वाक्य आहे असे म्हटले जात आहे.

याबरोबरच त्यापुढे म्हणतात, ' कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबाच तुम्हाला तुमच्या वाईट काळात वाचवत असतो. त्यामुळे तुम्ही जो मार्ग निवडणार आहात तो काळजीपूर्वक निवडा कारण ते आयुष्य फक्त तुम्हालाच माहीत असेल.'

हा व्हिडिओ शेअर करताना प्रियंकाने आपल्या आईसाठी एक भावनिक नोटदेखील लिहली आहे. ती लिहते, माझी प्रिय आई- 'अशी व्यक्ती जिच्याकडे आय़ुष्य जगण्याचा शहाणपणा आहे आणि तरीदेखील जिच्यात लहान मुलासारखा खळखळता आनंद नेहमीच जागृत असतो.

कवीसारखा हळवेपणा असूनही आम्हाला जिने सिंहिंनीसारखे जपले आहे. जिने मोठं आयुष्य जगलं आहे. तू आमची कुटुंबप्रमुख आहेस आणि जवळची मैत्रीणसुद्धा! आपलं कुटुंब खूप नशीबवान आहे कारण या कुटुंबात तू आहेस, ज्याला तुझं प्रेम आणि नेतृत्व मिळाले आहे.

70 व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. तुझ्या आजूबाजूला नेहमीच तुझ्यावर खूप प्रेम करणारी माणसं असावीत, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत. आय लव्ह यू. तुझी नेहमीची चॅम्पियन आणि फॅन. 'असे म्हणत प्रियंकाने आपल्या आईसाठी हटके पोस्ट लिहली आहे.

दरम्यान, प्रियंका नुकतीच रुसो ब्रदर्सनी दिग्दर्शित केलेल्या सिटॅडलमध्ये दिसून आली होती. आता नजीकच्या भविष्यकाळात फरहान अख्तर दिग्दर्शित 'जी ले जरा' मध्ये कॅटरीना कैफ आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT