Anupam Shyam passed away Dainik Gomantak
मनोरंजन

प्रतिज्ञा फ्रेम 'ठाकरू सज्जन सिंह' यांचे निधन

अनुपम श्याम (Anupam Shyam) हे गेल्या अनेक वर्षापासून किडनीच्या (Kidney) विकाराच्या आजाराने त्रस्त होते.

दैनिक गोमन्तक

अनेक बॉलीवूड (Bollywood) चित्रपट आणि टीव्ही (TV) मालिकांमध्ये त्यातच 'मन की आवाज प्रतिज्ञा' या हिंदी मालिकेमध्ये (Hindi series) ठाकुर सज्जन सिंह यांची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम श्याम यांचे 63 व्या वर्षी निधन झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. अनुपम श्याम (Anupam Shyam) हे गेल्या अनेक वर्षापासून किडनीच्या (Kidney) विकाराच्या आजाराने त्रस्त होते.

काही काळापूर्वी अनुपम श्याम हे त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे चर्चेत होते. त्यावेळी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना आर्थिक मदत केली. परंतु त्यांची किडनी निकामी झाली होती. तसेच ते डायलिसिसवर होते.

'प्रतिज्ञा' या टीव्ही मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

अनुपम श्याम हे 'मन की आवाज प्रतिज्ञा' या हिंदी मालिकेतील ठाकूर सज्जन सिंहच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाले. त्यांच्या भूमिकेचा प्रेक्षकांवर एवढा परिणाम झाला की प्रेक्षक त्यांची कॉपी करू लागले. मुलांनीसुद्धा त्यांच्यासारख्या मिशा ठेवायला सुरुवात केली होती. अनेक मोठ्या चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्याचे आयुष्य खूप दु:खात गेले. त्यांनी साकारलेल्या भूमिका अनेकांच्या मनात ताज्या राहतील.

अनुपम श्याम यांनी दस्तक, हजार चौरासी की मा, दुश्मन, सत्या, दिल से, लगान, नायक, शक्ती, पाप, राज, यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: अमली पदार्थ तस्करीचा डाव उधळला! काणकोण पोलिसांकडून 4.31 लाखांचे 'चरस' हस्तगत, 29 वर्षीय व्यक्ती अटकेत

Siolim Lake: शिवोलीवासीय जिंकले! तलावात भर घालून बांधकाम करण्याच्या प्रयत्नाला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Borim Bridge: 'लोकांनाही विकास हवा आहे, त्यासाठी त्यांना विश्‍वासात घेतले पाहिजे'; बोरीतील रस्त्याच्या अडचणी अन् मंत्र्यांचे आश्‍वासन

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

Luthra Brothers: लुथरांवरील सदोष मनुष्यवधाचे ‘105कलम’ चुकीचे! वकिलांचा दावा; काय केले युक्तिवाद? वाचा..

SCROLL FOR NEXT