संगीत रंगभूमी श्रीमंत करणारा ‘सावकार’!

 

Dainik Gomantak  

मनोरंजन

संगीत रंगभूमी श्रीमंत करणारा ‘सावकार’!

प्रसाद सावकार यांच्या मराठी संगीत रंगभूमीमधील योगदानाची दखल घेऊन 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने भारत (India) सरकारने त्यांना गौरवले.

दैनिक गोमन्तक

मराठी संगीत रंगभूमीला ललामभूत ठरलेले गोमंतकीय बुजुर्ग गायक नट, पद्मश्री प्रसाद सावकार हे आज 94 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ज्यांनी मराठी संगीत (Music) रंगभूमीच्या वैभवात मोलाची भर घातली अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक नट-नटांच्या मांदियाळीतील सावकारबुवा हे अखेरचा दुवा आहेत. त्यांचे समकालीन अनेक गायकनट काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सावकारबुवानी मात्र वयाच्या 85 व्या वर्षीसुद्धा ‘अवघा रंग एक झाला’ या नाटकात (Drama) भूमिका करून रसिकांना सुखद धक्का दिला होता.

आपले वडील रंगदेवता रघुवीर सावकार यांच्या ‘संशय कल्लोळ’ नाटकात त्यांनी पहिली भूमिका केली. त्यांचा ‘कटार काळजात घुसली’ नाटकाचा पाचवा प्रयोग पुण्याच्या बालगंधर्व नाट्य मंदिरात होता तेव्हा भारतरत्न पंडीत रवीशंकर (Ravi Shankar) व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Bhimsen Joshi) हे महान कलाकार मुद्दामहून प्रयोग पहायला आले होते. यावरून सावकारसारख्या गायक (Singer) नटांची काय थोरवी होती हे लक्षात येते. सावकारबुवा हे उत्तम नट तर होतेच पण परंतु त्यांनी शास्त्रीय गायनाची (Classical singing) तालीमही घेतली होती. ग्वाल्हेर घराण्याचे पंडित नारायणराव व्यास, आग्रा घराण्याचे पंडित गोविंदराव अग्नी, जयपूर घराण्याचे पंडित निवृत्तीबुवा सरनाईक हे थोर गुरू त्यांना त्यांना लाभले होते. शिवाय स्वरराज छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवण गुरू मानले होते.

त्यांची श्रवणमधुर वाणी, रसिला आवाज, प्रभावी ताना व हरकती श्रोत्यांवर छाप पाडत. 1960 ते 72 या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवनी देण्याच्या प्रमुख गायक नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. 1960मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘सुवर्णतुला’ लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकानी आणि संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले. त्यातील प्रसाद सावकार यांनी गायलेली नाट्यपदे संस्मरणीय ठरली. ‘जय गंगे भागीरथी’ या त्यांच्या पदाने तर लोकप्रियतेचा कळस गाठला.

गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर संस्थे’च्या ‘सौभद्र’, ‘मृच्छकटिक’, ‘विद्याहरण’, ‘मानापमान’ अशा नाटकातून सुरुवातीच्या काळात सावकरानी भूमिका वठवल्या. मो. ग. रांगणेकरांच्या नाट्य निकेतनच्या ‘रंभा’, ‘कुलवधू’, ‘कोणे एके काळी’, ‘एक होता म्हातारा’ अशा नाटकातील त्यांच्या भूमिकाही सरस ठरल्या. ‘लग्नाची बेडी’मधील गोकर्णाची त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली. ‘सुवर्णतुला’मधील ‘रतीहून सुंदर’ व ‘रागिणी मुखचंद्रमा’ या पदांच्या ध्वनिमुद्रिका अशाच गाजल्या. ‘मंदारमाला मधील ‘वसंत की बहार आई’ ही पंडित राम मराठे बरोबर त्यांची जुगलबंदी रसिकांना मंत्रमुग्ध करून जायची.

प्रसाद सावकार (Prasad Sawkar) यांचे मराठी रंगभूमीवरील योगदान अपूर्व असे आहे. ‘पेडगावचे शहाणे’ व ‘गोरा कुंभार’ चित्रपटातही त्यांना भूमिका करायचा योग आला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने भारत (India) सरकारने त्यांना गौरवले. त्यापूर्वी प्रतिष्ठेचे, ‘संगीत भूषण राम मराठे पुरस्कार’, ‘मास्टर दीनानाथ पुरस्कार’, महाराष्ट्र शासनाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘विष्णुदास भावे पुरस्कार’, दीनानाथ प्रतिष्ठानचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’, पुणे येथील भारत गायन समाजाचा ‘पंडित भास्करबुवा बखले’ पुरस्कार सांगली येथील ‘गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. संगीत नाटक अकादमी, कोलकत्ताने ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर पुरुष पुरस्काराने’ही त्यांना गौरवले आहे. 2018 मध्ये सावकारबुबांच्या रंगभूमीवरील आठवणीवर ‘मी नाटकवाला’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. सावकार बुवांचा सळसळता उत्साह, साधेपणा, मिश्कील स्वभाव, इतरांच्या जीवनात आनंद पेरून जातो. त्यांचे उर्वरित आयुष्य निरामय सुखाचे जावो ही प्रार्थना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT