Amitabh Bachchan Pran Dainik Gomantak
मनोरंजन

Pran:'जंजीर' रिलीज झाल्यानंतर 20 वर्षांनी पाहिला अन् प्राण यांनी लगेच अमिताभ बच्चन यांना फोन केला

अभिनेते प्राण यांनी जंजीर हा आपला मास्टरपीस रिलीजच्या 20 वर्षांनी पाहिला होता.

Rahul sadolikar

अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. मात्र यानंतरही त्यांना योग्य ते स्थान मिळाले नाही ज्यासाठी ते पात्र होते. बर्‍याच संघर्षानंतर 1973 साली 'जंजीर' चित्रपट आला. या चित्रपटाने बॉलीवूडला शतकातील सुपरहिरो दिला आणि अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंगमन'चा टॅग मिळाला.

 या चित्रपटात अमिताभ यांनी अभिनेते प्राणसोबत स्क्रीन शेअर केली होती. पण 20 वर्षांनंतर जेव्हा प्राणने हा चित्रपट पाहिला तेव्हा काहीही विचार न करता त्याने अमिताभ यांना फोन केला आणि बिग बींना असे काहीतरी सांगितले जे भविष्यसूचक ठरले.

'जंजीर' चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार बनवले. पण आश्‍चर्यकारक गोष्ट अशी की, तो एक चित्रपट हिट झाला, ज्यामध्ये प्राण हा आधीच प्रसिद्ध अभिनेता आणि हिंदी चित्रपटांचा खलनायक होता. 

प्राण यांनी स्वतः त्यांचा एकही चित्रपट पाहिला नसल्याचे सांगितले जाते. पण जेव्हा त्यांनी 'जंजीर' चित्रपट प्रदर्शित होऊन 20 वर्षांनी पाहिला तेव्हा त्याने लगेचच अमिताभ यांना फोन करून बोलले

आणि त्यांनी लगेचच बिग बींना फोन केला आणि सांगितले की, चित्रपटातील तुमचा अभिनय पाहून मला खूप आनंद झाला आहे. अमिताभ यांचा अभिनय त्यांना खूप आवडला. त्यांनी अमिताभला सांगितले की, एक दिवस तो टॉपचा अभिनेता होशील. 

अमिताभ यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याबाबत सांगितले की, ते स्वत: अभिनेता प्राणचे खूप मोठे चाहते आहेत. अभिनयाच्या दुनियेत येण्यापूर्वी ते प्राणचे शूटिंग पाहायलाही गेले होते आणि प्राण साहेबांचा साधेपणा पाहून ते त्यांचे चाहते झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा पोलिसांची मोठी कारवाई! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा बनावट अधिकारी जेरबंद; वागातोर येथील क्लब मालकाची 14 लाखांची फसवणूक

Konkan Railway: फुकट्यांचा 'गेम ओव्हर'! कोकण रेल्वेची मोठी कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केला 22 कोटींचा दंड

Goa Carnival: मडगावात रविवारी कार्निव्हल शोभायात्रा; सर्व तयारी पूर्ण, चोख सुरक्षा व्यवस्था; 200 पोलिस तैनात असणार

Goa Online Fraud: मोबाईलवरची 'ती' एक चूक अन् 74 लाख गायब! सायबर भामट्यांनी गोव्यात दोघांना घातला गंडा; फोनने केला गेम

IND vs PAK: विचित्र ॲक्शन अन् भेदक मारा; टीम इंडियासाठी पाकिस्तानचा 'हा' गोलंदाज ठरणार डोकेदुखी, आकाश चोप्राचा फलंदाजांना इशारा VIDEO

SCROLL FOR NEXT