प्रज्ञा साने, दीपाली देसाई, सिद्धेश जाधव  Dainik Gomantak
मनोरंजन

सुगम संगीतातील नक्षत्रे रविवारी गोव्यात

‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम 6 जानेवारी रोजी पणजी (Panji) येथे सायंकाळी साडेपाच वाजता ‘इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा’ सभागृहात सादर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

सुरईश’ आणि ‘मंदा व नारायण बांदेकर चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या सहयोगाने ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम रविवार 16 जानेवारी रोजी पणजी (Panji) येथे सायंकाळी साडेपाच वाजता ‘इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा’ सभागृहात सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या विविध रंगी मराठी गीतांनी रसिकांचे भावविश्व समृद्ध केले अशा गीतरचना या कार्यक्रमात ऐकण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.

मराठीतल्या या सुमधुर गीतरचना सादर करणार आहेत, ‘झी मराठी कलर्स’ या वाहिनीवरील ‘सारेगमप: सूर नवा, ध्यास नवा’ सारख्या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेले, मुंबईतील गायक कलावंत. 2008 मधील ‘झी मराठी सारेगमप’चा महाअंतिम फेरीचा मानकरी व ईटीव्ही ‘गौरव महाराष्ट्राच्या’ टॉप पाचचा मानकरी सिद्धेश जाधव, ‘स्वर नवा, ध्यास नवा’ या कार्यक्रमातील महाअंतिम फेरीची उत्कृष्ट गायिका प्रज्ञा साने व ‘रामा सिंड्रेला’ तसेच ‘हिरकणी’ चित्रपटासाठी पार्श्वगायन केलेली दीपाली देसाई या कार्यक्रमात गाणार आहेत. युवा प्रतिभेची लोकप्रिय निवेदिका गौरी भिडे यांचे निवेदन कार्यक्रमाला लाभणार आहे. गोमंतकीय वादक नितीन कोरगावकर (तबला), बाळकृष्ण मेस्त (सिंथेसाइजर), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड) शिवानंद दाभोळकर (संवादिनी) व तारानाथ होलेगद्दे (तालवाद्य) हे साथ-संगत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. मात्र कोरोना (Corona) महामारीची बंधने पाळणे आवश्यक आहे

सुगम संगीतातील नक्षत्रे

प्रज्ञा साने : प्रज्ञा साने हिने मुंबई येथे अखिल भारतीय संगीत स्पर्धेत प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. समीर अभ्यंकर व शुभदा पावगी हे तिचे शास्त्रीय गायनातील गुरु आहेत तर दीपाली महापात्रा या सुगम संगीतातील तिच्या गुरू आहेत. देशभर अनेक कार्यक्रमातून तिने रसिकांची दाद मिळवली आहे.

दीपाली देसाई : मुंबई (Mumbai) येथे पंडित मधुकर जोशी यांच्याकडे शास्त्रीय गायन व उत्तरा केळकर यांच्याकडे सुगम संगीत गायनाचे शिक्षण घेत असलेली, दीपाली देसाई ही युवा प्रतिभाशाली गायिका आहे. पंडित राम मराठे नाट्य संगीत शिष्यवृत्ती तिला लाभली आहे. ‘संशयकल्लोळ’ मध्ये प्रसाद सावकार व नयना आपटे या दिग्गजांबरोबर तिने भूमिका वठवली आहे. ती आकाशवाणीची सुगम गायनातील मान्यताप्राप्त गायिका आहे.

सिद्धेश जाधव : सिद्धेश जाधव हे पंडित अच्युत ठाकूर व नरेंद्र कोठंबीकर यांचे शिष्य आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे क्षेत्रीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करून 2007 ते 2011 या काळात सुवर्णपदके मिळवली आहेत. शिवाजी विद्यापीठात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी चार वर्षे काम केले आहे. आशियाई सांस्कृतिक महोत्सवात (Festival) तीन वेळा त्यांचा सहभाग राहिला आहे. पोलंड येथे ‘विवा कलतुरा इस्कॉन’ कार्यक्रमात ते प्रमुख गायक होते.

गौरी भिडे : निवेदन, काव्यवाचन, अभिवाचन, मुलाखत याद्वारे आपला ठसा उमटवलेल्या गौरी भिडे यांनी अनेक नामवंतांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ‘दिशा’ साप्ताहिकासाठी त्यांनी लिखाण केले आहे. ‘वेध अॅक्टींग अकॅडमी’त त्या थिएटर ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. भरतनाट्यम, गायनाचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे.

- नितीन कोरगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT