Prabhu Deva Nayantara  Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Prabhu Deva: भारताचा मायकल जॅक्सन प्रभू देवा नयनताराच्या प्रेमात पार वेडा झाला होता...

अभिनेता आणि कोरिओग्राफर प्रभू देवाचा आज वाढदिवस... त्यानिमित्ताने पाहुया त्याची लव्हस्टोरी

Rahul sadolikar

Happy Birthday Prabhu Deva: आपल्या डान्सच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेता, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवाचा आज वाढदिवस, त्यानिमित्य पाहुया कसा घडला एक महान कोरिओग्राफर ज्याने भारताचा मायकल जॅक्सन हा किताब मिळवला.

भारताचे 'मायकेल जॅक्सन' म्हणून ओळखला जाणारा प्रभू देवा 3 एप्रिल रोजी 49 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याचे पूर्ण नाव 'प्रभुदेव सुंदरम' आहे. 3 एप्रिल 1973 रोजी म्हैसूर येथे जन्मलेल्या प्रभू देवाला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती

प्रभुदेवाचे वडील देखील एक उत्तम नर्तक होते, त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये डान्स मास्टर म्हणून काम केले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब नृत्याशी संबंधित आहे. त्यांचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेंद्र प्रसाद हे देखील कोरिओग्राफर आहेत.

प्रभू देवा त्याच्या मायकल जॅक्सनसारख्या डान्ससाठी प्रसिद्ध असला तरी प्रत्यक्षात तो एक क्लासिकल डान्सर आहे. प्रभूदेवाने एका मुलाखतीत त्यांच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने सांगितले. प्रभू देवाने सांगितले होते, 'मी खरं तर एक क्लासिकल डान्सर आहे. 

मी माझ्या गुरूंकडून भरतनाट्यम शिकलो, त्या काळात मायकल जॅक्सनचा थ्रिलर अल्बम आला. मायकल जॅक्सनचा माझ्यावर सर्वात मोठा प्रभाव आहे.

नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रभूचा पहिला चित्रपट 'वेत्री विझा' होता असे म्हटले जाते. 1994 मध्ये त्यांनी 'इंदू' हा चित्रपट केला होता. त्याच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले आहे.

इतकंच नाही तर त्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी त्याला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 2019 मध्ये त्यांना पद्मश्रीही मिळाला आहे., प्रभू देवाने 2009 मध्ये 'वॉन्टेड' चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता.

सलमान व्यतिरिक्त प्रभुदेवाने अक्षयसोबत राउडी राठौर आणि शाहिदसोबत राजकुमार असे अनेक हिट चित्रपट केले.  

प्रभूदेवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमीच चर्चेत असतात. एक काळ असा होता की साऊथ अभिनेत्री नयनतारासोबतच्या त्याच्या नात्याच्या बातम्या चर्चेत होत्या. चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले. नयनताराने प्रभू देवाला डेट करायला सुरुवात केली तेव्हा कोरिओग्राफरचे लग्न झाले होते.

रिपोर्ट्सनुसार, दोघेही प्रेमात इतके वेडे झाले होते की ते एकत्र राहू लागले. त्याने 2011 मध्ये आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यांचे 16 वर्षांचे लग्न मोडले, परंतु काही काळानंतर हे नाते कायमचे संपुष्टात आले.

2022 मध्ये नयनताराने विघ्नेश शिवनशी लग्न केले. लग्नाच्या सुमारे 4 महिन्यांनंतर हे जोडपे जुळ्या मुलांचे पालक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT