Prabhas Dainik Gomantak
मनोरंजन

Prabhas: प्रभास अडकणार विवाहबंधनात; जवळच्या व्यक्तीकडून खुलासा, 'ही' अभिनेत्री...

Prabhas: आता प्रभास लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमन्तक

Prabhas: मनोरंजन सृष्टीतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे कधी त्यांच्या वक्तव्यामुळे कधी त्यांच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे ते चर्चेत असतात. हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात.

आता साऊथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय कलाकारा बाहुबली फेम प्रभासच्या लग्नाच्या चर्चांना वेग आला आहे. प्रभासच्या कुटुंबातील व्यक्तीने याबद्दल खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, प्रभासच्या चुलतीने शामलादेवीने याबद्दल एका प्रेस कॉनफर्न्सच्या दरम्यान हे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटल्यानुसार, 'आमच्याकडे दुर्गादेवीचे आशीर्वाद आहे. देव आपल्या सर्वांची चांगली काळजी घेईल.

प्रभास( Prabhas ) नक्कीच लग्न करणार आहे आणि ते लवकरच होणार आहे. आम्ही तुम्हा सर्वांना लग्नासाठी आमंत्रित करू असे त्यांनी म्हटले आहे. मात्र तो कोणाशी लग्न करणार हे मात्र उघड करण्यात आले नाही.

दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्री किर्ती सेनॉन( Kriti Senon ) आणि बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्याशी प्रभासचे नाव जोडले जाते.

मध्यंतरीच्या काळात प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र ते एआयबेस्ड फोटो होते. आता प्रभास लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

प्रभासच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तरी, तो नुकताच आदिपुरुषमध्ये दिसून आला होता. प्रभास आता 'सालार'मध्ये दिसणार आहे.

प्रशांत नीलचा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान स्टारर 'डिंकी'शी टक्कर देणार आहे. आदिपुरुषच्या अपयशानंतर आता सालार प्रभासला मदत करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT