Pankaj Udhas Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Pankaj Udhas Passes Away: "ज्यांच्या गझल थेट आत्म्याशी...." गायक पंकज उधास यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

Pankaj Udhas Passes Away: भारत-चीन युद्धादरम्यान पंकज उधास यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिल्याचे सांगितले जाते.

दैनिक गोमन्तक

Popular gazal singar Pankaj Udhas Passes Away at age 72

ज्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने अनेक गझल आणि गाणी अजरामर केली असे लोकप्रिय गायक पद्मश्री विभूषित पंकज उधास यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची मुलगी नायब यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, ' 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती देताना दुःख होत आहे.' या बातमीनंतर संपूर्ण देशभरात दु:ख व्यक्त केले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंकज उधास यांच्या करिअरचा प्रवास

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती. यामुळे त्यांनी त्यांची तीन मुले मनहर, निर्मल आणि पंकज उधास यांना राजकोट म्युझिक अकादमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. येथेच तबला शिकायला गेलेल्या पंकज उधास यांनी शास्त्रीय संगीतातील बारकावे शिकले. भारत-चीन युद्धादरम्यान पंकज उधास यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिल्याचे सांगितले जाते.

त्यानंतर त्याने 'आये मेरे वतन के लोगों' हे गाणे गायले, तर 1970 मध्ये आलेल्या 'तुम हसीन में जवान' या चित्रपटातील 'मुन्ने की अम्मा ये तो बता' या गाण्याने त्यांनी चित्रपटामध्ये गायनाची सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यांनी त्यांचे पहिलेच गाणे किशोर कुमार यांच्यासोबत गायले होते. पण यानंतर त्यांनी 1980 मध्ये त्यांची गझल अल्बम 'आहट' रिलीज करून पदार्पण केले. यानंतर त्यांनी 1981 मध्ये 'मुकर्रर', 1982 मध्ये 'तरन्नूम', 1983 मध्ये 'मेहफिल' यांसारख्या गझल अल्बममधून स्वतःची ओळख निर्माण केली. पण 1986 मध्ये महेश भट्ट यांच्या 'नाम' चित्रपटातील 'चिठ्ठी आयी है' या गाण्यामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ट्विट करत पंकज उधास यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहले आहे की- 'पंकज उधासजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. ज्यांच्या गायनातून भावना व्यक्त होत असत. त्यांच्या गझल थेट आत्म्याला भिडत असत, संवाद साधत असत. ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते, ज्यांच्या सुरांनी अनेक पिढ्या ओलांडल्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याच्याशी झालेला मला आजही संवाद आठवतो. त्यांच्या जाण्याने संगीतसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरुन निघू शकत नाही.'

पद्मश्री पुरस्कार

दरम्यान, सात समुंदर पार गया तू, हमको ज़िंदा मार गया तू, दिल के रिश्ते तोड़ गया तू, आंख में आंसू छोड़ गया तू...', चिट्ठी आई है... अशा अनेक गझल त्यांनी अजरामर केल्या आहेत. त्यांच्या संगीतसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकाराने २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौवरवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

SCROLL FOR NEXT