Pooja Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

Pooja Bhatt : वडील - मुलीच्या नात्याला... महेश भट्ट यांच्यासोबतच्या 'त्या' फोटोवर अखेर पूजा भट्ट बोलली...

अभिनेत्री पूजा भट्ट हिने तिच्या आयुष्यातल्या अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या त्या एका फोटोवर अखेर प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul sadolikar

Pooja Bhatta on her contravrsial Photo with Mahesh Bhatt : साल 1994, 90 च्या दशकातले प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट प्रसिद्धीच्या शिखरावर होते. एकापेक्षा एक हीट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे यशस्वी दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती.

आणि अचानक एका मासिकाच्या कव्हर पेजवर एक वादग्रस्त फोटो छापून आला आणि देशभरात खळबळ माजली. महेश भट्ट यांचा मुलगी पूजा भट्टसोबतचा किस करतानाचा तो फोटो पाहुन अनेकांच्या भुवया उंचावल्या.

या प्रकरणाचे पडसाद उमटले आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यावर अनेकदा पूजाला या प्रकरणामुळे ट्रोल केले जाते. आता यावर स्वत: पूजानेच काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

वादग्रस्त फोटो काय होता?

प्रसिद्ध झालेल्या त्या कव्हरपेजवर पूजा तिच्या वडिलांना चुंबन घेताना दिसली. साहजिकच यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणात दोघांवर टीका झाली.

आता इतक्या वर्षानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्टने मासिकाच्या मुखपृष्ठावर आणि तिच्या वडिलांसोबतच्या त्या फोटोबद्दल सांगितले. 

सिद्धार्थने विचारले

सिद्धार्थ कन्नगने घेतलेल्या या मुलाखतीत पूजा भट्टला विचारण्यात आले की, महेश भट्टसोबत व्हायरल झालेल्या किसिंग फोटोबद्दल तिला आता पश्चात्ताप वाटतो का ?

 प्रत्युत्तरात पूजाने उत्तर दिले, “नाही, कारण मला ती गोष्ट अगदी सोपी होती आणि मला वाटते की दुर्दैवाने त्या फोटोबद्दल गैरसमज पसरवून त्याचे चुकीचे वर्णन करण्यात आले.

शाहरुख म्हणाला होता

या व्हायरल फोटोवर बोलताना पूजा म्हणाली "मला आठवते की शाहरुखने मला एकदा सांगितले होते की, जेव्हा तुला मुलं असतात, तेव्हा अनेकदा मुल पालकांना चुंबन घेण्यास सांगतात. 

आणि ते या मार्गाने जातात. या वयातही मी माझ्या वडिलांसाठी तीच 10 पौंड वजनाची मुलगी आहे. आणि त्यांच्यासाठी नेहमीच तशी राहीन.”

वडील मुलीच्या नात्यावर..

यावर बोलताना ती पुढे म्हणाली की हा एक पूर्णपणे निर्दोष क्षण होता. “हा एक निष्पाप क्षण कॅप्चर केलेला होता ज्याचा अर्थ अनेक प्रकारे व्यक्त केला गेला आहे..

 मी इथे बसून त्याचा बचाव करणार नाही. जर कोणी वडील-मुलीच्या बंधावर असा प्रश्न विचारू शकतो, तर ते सर्वात वाईट विचार करणारे लोक आहेत , ”.

पूजा भट्ट सर्वात मोठी मुलगी

पूजा भट्ट ही महेश भट्ट आणि किरण भट्ट यांची मोठी मुलगी आहे. त्यांना एक मुलगा राहुल भट्ट देखील आहे. महेश भट्ट यांनी 1986 मध्ये सोनी राजदानशी लग्न केले आणि त्यांना शाहीन आणि आलिया भट्ट या दोन मुली आहेत.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT