Ponniyin Selvan-1 Dainik Gomantak
मनोरंजन

'Ponniyin Selvan 1' चा जगभरात धमाका; दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा आकडा

Ponniyin Selvan : 'पोन्नियिन सेलवन 1' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

'पोन्नियिन सेलवन 1' हा चित्रपट सध्या सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. मणिरत्नमन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. 

'पोन्नियिन सेलवन 1' हा चित्रपट (Movie) 30 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज झाला. जगभरात हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 80 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात 150 कोटींची कमाई केली आहे.

'पोन्नियिन सेलवन 1' हा चित्रपट सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात विक्रम, जय रवी, कार्थी, तृषा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तर एआर रहमानने या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. 'पोन्नियिन सेलवन' हा चित्रपट दोन भागांत रिलीज होणार आहे. 'पोन्नियिन सेलवन'चा दुसरा भाग नऊ महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नम 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी 1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT