Mithun Sharma and Palak Muchhal Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Mithun Palak: पलक, मिथुनला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद; शेअर केली भावनिक पोस्ट

आमच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तावर तुमचे आशीर्वाद मिळणे हा आमच्यासाठी बहुमान आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

संगीतकार मिथुन शर्मा आणि पार्श्वगायक पलक मुच्छाल (Mithun Sharma and Palak Muchhal Wedding) यांनी रविवारी, 26 नोव्हेंबर रोजी लग्न केले. पलक, मिथुनवर चौफेर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच दोघांना एका विषेष व्यक्तीकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मिथुन आणि पलक यांना आशीर्वाद दिले आहेत. मिथुन आणि पलक यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधानांच्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, पंतप्रधानांच्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे.

पलक आणि मिथुन या जोडप्याला आशीर्वाद देताना पंतप्रधानांनी लिहिले, "पलक आणि मिथुन नव्या आयुष्याचा तसेच, विश्वास आणि एकत्र राहण्याच्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. लग्नाच्या शुभ प्रसंगी दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही दोघेही एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी दाखवत राहा. दोघांतील स्नेह वाढत राहो."

"लग्नासाठी दोन्ही कुटुंबांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. लग्नाच्या रिसेप्शनसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मनापासून आभार. या महत्त्वाच्या प्रसंगासाठी मी पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. पलक आणि मिथुनला अनंत आशीर्वाद." अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'मौला मेरे मौला', 'ए खुदा' आणि 'फिर मोहब्बत' ('मर्डर 2') यांसारख्या गाण्यांमुळे प्रसिद्धस आलेल्या मिथुनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. "तुमचे पत्र आमच्या हृदयाला भिडले आहे. तुम्ही दिलेला आदर आणि प्रेमाबद्दल आपले धन्यवाद. आमच्या लग्नाच्या शुभ मुहूर्तावर तुमचे आशीर्वाद मिळणे हा आमच्यासाठी बहुमान आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT