PM Narendra modi praise kili paul and neema in man ki bat Dainik Gomantak
मनोरंजन

Kili Paul-Neemaच्या टॅलेन्टवर पंतप्रधान मोदीही झाले इंप्रेस

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला किली पॉल आणि नीमाचा उल्लेख

दैनिक गोमन्तक

टांझानियन भाऊ-बहीणींची जोडी कि पॉल आणि निमा (Kili Paul-Neema) सोशल मीडिया स्टार बनले आहे. भारतीय गाण्यांच्या परफेक्ट उच्चारामुळे ते लोकप्रिय झाले आहे. आणि आता त्यांची ही कला केवळ जनतेपर्यंतच नाही तर थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली आहे. आज रविवारी 'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) किली पॉल आणि नीमा यांच्या कलेचा उल्लेख केला.

भाऊ आणि बहिणीचे पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

'मन की बात'मध्ये किली आणि नीमाबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले- 'भारतीय संस्कृती आणि माझ्या परंपरेबद्दल बोलतांना आज मला तुमची 'मन की बात'मध्ये दोन लोकांशी ओळख करून द्यायची आहे. आजकाल किली पॉल आणि त्याची बहीण निमा हे दोन टांझानियन भाऊ-बहीण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप चर्चेत आहेत. आणि मला खात्री आहे की तुम्ही देखील त्यांच्याबद्दल ऐकले असेल. त्यांना भारतीय संगीताची आवड आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रिय झाले आहे. ते दोघेही यासाठी किती मेहनत घेतात हे त्यांच्या ओठांच्या हालचाल करण्याच्या पद्धतीवरून दिसून येते.'

त्यांचे कौतूक करताना मोदी पुढे म्हणाले, नुकताच प्रजासत्ताक दिनानिमित्त 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हणतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक गाणे गाऊन लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. किली आणि नीमा या दोन भावंडांचे या अद्भुत सर्जनशीलतेबद्दल मी मनापासून कौतुक करतो. काही दिवसांपूर्वी टांझानियातील भारतीय दूतावासात त्यांचा गौरव करण्यात आला आहे.'

राता लांबिया गायल्यानंतर मिळाली लोकप्रियता

पंतप्रधानांकडून एखाद्याच्या प्रतिभेला एवढा आदर मिळणे ही एक मोठी उपलब्धी आहे. किली आणि नीमा यांनी भारतीय चित्रपटांच्या अनेक गाण्यांवर उत्कृष्ट लिप्सिंग केले आहे. शेरशाह चित्रपटातील राता लांबिया या गाण्यानंतर त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. दोघेही त्यांच्या पारंपारिक मसाई कपड्यांमध्ये हे भारतीय गाणे गातात आणि नाचतातही. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओची ही स्टाइल सर्वांनाच आवडते.

फोनमध्ये या गाण्याची रेकॉर्डींग करण्यासाठी कायलीला त्याच्या गावापासून दोन तास दूर दुसऱ्या ठिकाणी जाऊन फोन चार्ज करावा लागतो. तो लिप्सिंगसाठी गाण्याच्या ओळी लक्षात ठेवतो आणि त्याचा अर्थ समजून घेतो. त्यानंतर दोन्ही भाऊ-बहीण ही गाणी तयार करतात. त्यांच्या या मेहनतीचे फळ आहे की त्यांच्या प्रसिद्धीची आणि त्यांनी सादर केलेल्या कलेची आवड भारतीयांनाही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT