PM Modi Dainik Gomantak
मनोरंजन

PM Modi: 'आता सत्य समोर येईल...' यामीच्या 'आर्टिकल 370' चे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

PM Modi: 'आर्टिकल 370' चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

दैनिक गोमन्तक

PM Modi: सध्या बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट रिलिज होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. आता यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला आर्टिकल ३७० हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असताना यामी गौतमच्या या चित्रपटाचे कौतुक करत यातून सत्य परिस्थिती लवकरच बाहेर येईल, लोकांना योग्य माहिती मिळेल असे म्हटले होते. त्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या आनंदाला पारावार उरला नाही, जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूतील भाषणात तिच्या 'आर्टिकल 370' चित्रपटाचा उल्लेख केला.

यामीने पीएम मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा आनंदही व्यक्त केला आहे. यासोबतच तिने म्हटले आहे की, आमची टीम तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो असे म्हटले आहे.

'आर्टिकल 370' चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये 'कलम 370' हटवतानाची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. आदित्य धर, अर्जुन धवन आणि आदित्य सुहास जांभळे हे लेखक आहेत. दिग्दर्शनही आदित्य सुहास यांनीच केले आहे. यामी व्यतिरिक्त या चित्रपटात प्रियामणी आणि किरण कर्माकर ही स्टारकास्ट आहे.

दरम्यान, यामीच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर यामी गौतम सध्या तिची पहिली प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसली. यामी आणि आदित्य यांचा विवाह ४ जून २०२१ रोजी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT