Sunny Deol's drunken video goes viral  Dainik Gomantak
मनोरंजन

दारु पिऊन चालताही येईना... हा व्हायरल व्हिडीओ सनी देओलचा आहे?

अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

Sunny Deol's drunken video goes viral : 2023 हे साल अभिनेता सनी देओलसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. या वर्षी सनी देओलने त्याच्या गदर 2 या सिक्वलमधून बॉलीवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. गदर 2 ने 500 कोटींच्या पुढे कमाई करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. सध्या सनीची चर्चा सुरु आहे ती एका व्हायरल व्हिडीओमुळे. या व्हिडीओत असं काय आहे चला पाहुया.

गदरचं यश

सनी देओल हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखला जातो. यावर्षी या अभिनेत्याने गदर २ सारखा उत्तम ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सनी देओलचे दिवस परत आल्याचे सर्वांनी सांगितले. गदरनंतर सनी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सनी देओलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सनी देओल यूजर्सना थक्क करताना दिसत आहे

सनी देओल नशेत

नुकतेच 'गदर 2'चे यश साजरे करणाऱ्या सनी देओलला अशा व्हिडीओमध्ये नशेत पाहून सोशल मीडियावर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. KRK ने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, हा खूप धोकादायक आहे. येथे सनी जुहूमध्ये रस्त्यावर नशेत चालताना दिसत आहे. 

या व्हिडिओमध्ये सनी देओल रस्त्याच्या मधोमध कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. मात्र, ऑटो थांबल्यावर त्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच हसू पाहायला मिळतं. यानंतर रिक्षाचालक सनीला चालण्यास मदत करतो आणि ऑटोमध्ये बसवतो.

चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही संतापले आहेत. गदर 2 चे यश त्यांना सांभाळता येत नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. एकजण म्हणाला, या माणसाला काय प्रॉब्लेम आहे? दहा वर्षांत एका यशस्वी चित्रपटानंतर तो आता स्वत:ला हरवून बसला आहे. 

एकजण म्हणाला - पाजींनी अख्खी बाटली खाल्लेली दिसते. दुसरा म्हणाला - बॉलीवूडमधील प्रत्येकजण ड्रगिस्ट आहे. काहींनी म्हटले आहे - ते यश हाताळू शकत नाहीत?

हा चित्रपटातील सीन?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी असेही म्हटले की, सनीचा व्हिडिओ जाणूनबुजून शेअर केला आहे जेणेकरून लोक तिचा तिरस्कार करू शकतील. मात्र, शशांक उद्रापूरकर दिग्दर्शित त्याच्या 'सफर' या चित्रपटाच्या शूटिंगमधील ही दृश्ये असल्याचे काहींनी म्हटले आहे. सनी देओलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो मद्यपान करत नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ खरा आहे की चित्रपटातील एक दृष्य हे अद्याप समजले नाही.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT