बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) तिच्या अभिनयासाठी तसेच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या वक्तव्यामुळे ती लोकांच्या नाराजीचा बळी ठरते. अशा परिस्थितीत आता पायलला सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर करणे महागात पडले आहे. कारण आता या व्हिडिओमुळे पायलवर पुण्यात (Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या आरोपावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री पायल रोहतगीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 153 (अ), 500 कलम 505 (2) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होता वाद
या व्हिडिओमध्ये पायलने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यानंतर पायलवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
अटक करण्यात आली होती
15 डिसेंबर 2019 रोजी नेहरू-गांधी कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अहमदाबादमधील बुंदी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. नंतर तिला अटक करण्यात आली. 16 डिसेंबर 2019 रोजी न्यायालयाने तिला 24 डिसेंबर 2019 पर्यंत 9 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 17 डिसेंबर रोजी तिची जामिनावर सुटका झाली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.