Karan VIR Mehra Divorce news
Karan VIR Mehra Divorce news Dainik Gomantak
मनोरंजन

पवित्र रिश्ता फेम करण वीर मेहराच्या व्यक्तिगत आयुष्यात वादळ... पत्नी निधीपासून झाला कायमचा वेगळा

Rahul sadolikar

Karan VIR Mehra Divorce news : पवित्र रिश्ता ही सिरीयल देशभरातल्या घराघरात पोहोचली होती. पवित्रा रिश्ताच्या मालिकेच्या कथानकाबरोबर मालिकेतील पात्रांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही प्रेक्षकांना भलतं आकर्षण होतं.

मालिकैतील पात्रांच्या आयुष्यातल्या अपडेट्स आजही प्रेक्षकांना आकर्षित करतात. नुकत्याच समोर आलेल्या बातमीनुसार मालिकेतील करन वीर मेहराच्या व्यक्तिगत आयुष्यात मोठा भूकंप आल्याचे वृत्त समोर आले आहे.

करण आणि निधीचा घटस्फोट

पवित्र रिश्ता अभिनेता करण वीर मेहराबाबत एक बातमी समोर आली आहे. अभिनेता करण वीर मेहरा हा त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला आहे. करण वीर मेहरा आणि निधी सेठ यांचा घटस्फोट झाला आहे. स्वत: निधीनं याबाबत खुलासा केला आहे.

2021 साली झाले होते लग्न

24 जानेवारी 2021ला दिल्लीतील गुरुद्वारामध्ये करण वीर मेहराने एका खाजगी समारंभात निधी सेठसोबत लग्न केले होते. ज्याचे फोटो सोशल मिडियावर खुपच व्हायरल झाले होते.

करण आणि निधी यांच्या नात्यात गेल्या अनेक दिवसांपासून खटके उडत होते. त्यांच्या नात्यातील दुरावा वाढल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

निधीने सांगितले घटस्फोटाबद्दल

निधीने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, करणने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याबद्दल बोलताना निधी म्हणाली की, 'हो, तीन महिन्यांपूर्वी आमचा घटस्फोट झाला आहे. वर्षभरापूर्वी आम्ही वेगळे झालो होतो.

मला असं वाटतं की नात्यात रोजची भांडणे ही असह्य असतात. आजही लोकांना वागणूक आणि माणसांबद्दल माहिती नसते ज्यामुळे नातेसंबंध बिघडतात. अशा परिस्थितीत आपण कधीही एकत्र राहू शकत नाही.

करण वीर मेहराचे हे दुसरे लग्न

वैवाहिक जीवनात मानसिक शांतता, एकमेकांचा आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं खुप महत्त्वाचं आहे.''

करण वीर मेहराचे हे दुसरे लग्न होते. त्याने 2009 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण देविकासोबत पहिले लग्न केले आणि 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने निधीसोबत विवाह केला मात्र या नात्याचाही आता शेवट झाला आहे.करण आणि निधीची पहिली भेट 2008 मध्ये एका कमर्शियलच्या सेटवर झाली होती.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT