Pathan Controversy Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Controversy: हुश्श ! 10 कट्सनंतर 'पठाण'ला मिळणार UA सर्टिफिकेट..

पठाण चित्रपटाला आता प्रचंड वादामुळे सेन्सॉर बोर्डाने UA सर्टिफिकेट दिलं आहे

Rahul sadolikar

शाहरुख खानचा आगामी 'पठाण' गेले कित्येक दिवस सलगपणे चर्चेत आहे. रोज एक नवा वाद उभा राहत असताना शेवटी या वादात 'सेन्सॉर'ने मध्यस्थी केली आणि चित्रपटात काही बदल सुचवले.

चित्रपट रिलीज होण्याआधी एकदा सेन्सॉरला दाखवण्याची सुचना केली होती, आणि शेवटी 10 कट्स केल्यानंतर आता चित्रपटाला UA सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.

'पठाण'चं गाणं रिलीज झालं आणि त्यावरुन देशभरात गोंधळ सुरू झाला. चित्रपटातल्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन मोठा गोंधळ होण्याचं कारण म्हणजे या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या बिकीनीचा रंग.

या गाण्यात भगवा रंग वापरल्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या अशी भूमीका काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली त्यानंतर पठाणची चर्चा जोरदारपणे सुरू झाली.

काही दिवसांपुर्वी बिहारमध्ये शाहरुख खानसह 5 जणांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चित्रपट असा वादग्रस्त ठरत असताना आता सेन्सॉर बोर्डाने 10 सिन कट्स केल्यानंतर आता चित्रपटाला UA सर्टिफिकेट मिळालं आहे.

काही दिवसांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं होतं हा चित्रपट बदल सुचवल्यानंतर आम्हाला दाखवण्यात यावा.

शेवटी 10 कट केल्यानंतर हा चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहे. चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डानेच हिरवा कंदिल दाखवल्यामुळे लवकरच चित्रपट थिएटरमध्ये दिसेल हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

SCROLL FOR NEXT