Pathan box office collection Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Box Office Collection: शाहरुखने बॉलिवूडच्या भितीचं सावट दूर केलं आहे?

शाहरूख खानच्या पठाणचं बॉक्स ऑफिस कलेक्शन अनेक रेकॉर्ड मोडत आहे

Rahul sadolikar

शाहरुख खानच्या पठाणने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. रिलीजच्या तारखेपासुन या चित्रपटाने छप्परफाड कमाई करायला सुरूवात केली आहे. तिसऱ्या दिवशी पठाण कमाईच्या बाबतीत थोडा सुस्त पडला होता ;पण पाचव्या दिवशी चित्रपटाने पुन्हा वेग पकडला आहे. (Pathan Box Office Collection)

पठाण सुरूवातीला प्रचंड वादग्रस्त ठरला. चित्रपटातल्या बेशरम रंग या गाण्याने मोठा वाद निर्माण झाला यावरुन चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात आला पण तरीही जगभरात या चित्रपटाची आणि शाहरूखची असलेली क्रेझ जराही कमी झालेली नाही.

कोरोनाच्या काळापासून बॉक्स ऑफिसवर एका चांगल्या हिटसाठी आसुसलेल्या सिनेमा हॉलची प्रतिक्षा 'पठाण'मुळे संपलेली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'च्या हिट होण्यामुळे बॉलिवूडला बॉक्स ऑफिसवर पुन्हा उभं राहण्याची नवी उमेद मिळाली आहे.

अलिकडच्या काळात बॉलिवूडचे अनेक चित्रपट येऊन गेले ज्यांना लोकांनी साफ नाकारले आणि हे सगळं बॉलिवूडसाठी धोकादायक होते. बॉलिवूडच्या चित्रपटांना आता प्रेक्षक स्वीकारणार का? हा प्रश्न पडावा इतकी स्थिती खराब झाली होती.

अखेर शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाची जादू बॉलीवूडला या धोक्यातून बाहेर काढण्यासाठी कामी आली. 'पठाण'च्या पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारीही बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातला होता, चित्रपटाने 30-40 कोटी नाही तर जवळपास 65 कोटींची कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी बॉलीवूड चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड तोडणाऱ्या 'पठाण'ची जादू रविवारी पाचव्या दिवशीही दिसून आली. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' या चित्रपटाला विस्तारित वीकेंड तसेच पहिल्या वीकेंडला सुट्टी (प्रजासत्ताक दिन) याचा खूप फायदा झाला आहे. 

बॉक्सऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, रविवारी, 5 व्या दिवशी या चित्रपटाने सुमारे 65 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसांत देशभरात सुमारे 275 कोटींची कमाई केली आहे. य चित्रपटाच्या यशाने बॉलिवूडचे चांगले दिवस शाहरुखने पुन्हा परत आणले असंच म्हणावं लागेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Goa Live News: वाळपई बसस्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती पहा...

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

SCROLL FOR NEXT