Parineeti - Raghav Dainik Gomantak
मनोरंजन

Parineeti - Raghav : परिणितीने पती राघव चढ्ढासाठी बनवलेल्या स्पेशल गाण्याची सोशल मिडीयावर चर्चा...

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खा.राघव चढ्ढा दोघे 24 सप्टेंबरला विवाहबद्ध झाले आहेत. या विवाहसोहळ्यानंतर एका गाण्याची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे.

Rahul sadolikar

Parineeti Sung Song for Husband Raghav Chadhdha : 24 सप्टेंबरला उदयपूरमध्ये एक मोस्ट अवेटेड लग्न पार पडलं. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्राने एकमेकांचे कायमचे जीवनसाथी बनले.

काही काळापूर्वी झालेल्या साखरपुड्यानंतर परिणिती- राघवच्या लग्नाची चाहत्यांना प्रतिक्षा होती. ती 24 सप्टेंबरला पूर्ण झाली.

लग्न पार पडलं तरी अजुनही परिणिती - राघवच्या लग्नाची चर्चा सोशल मिडीयावर सुरूच आहे. विशेषता परिणितीने राघव चढ्ढा यांच्यासाठी गायलेल्या गाण्याचं चाहत्यांना कौतुक वाटत आहे.

लग्नात वाजले रेकॉर्डेड गाणे

परिणितीने राघव चढ्ढासाठी गायलेलं हे गाणं हे लग्नादिवशीही वाजवण्यात आलं होतं. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा विवाहसोहळा 24 सप्टेंबर पार पडला. आता, ओ पिया नावाच्या या गाण्याची सोशल मिडीयावर मोठीच चर्चा सुरू आहे.

ओ पिया...

अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील एक चांगली गायिका आहे. परिणिती तिची गाणी सोशल मिडीयावर शेअर करत असते. आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासाठी परिणितीने लग्नासाठी एक स्पेशल गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याचं नाव आहे ओ पिया. 

परिणितीच्या या गोड गाण्याने त्यांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. हिंदी आणि पंजाबी भाषेतील बोल असलेल्या या गाण्यात परिणीतीने राघववरील तिचे प्रेम व्यक्त केले.

ओ पिया, चल चलें

हे गाणं , गौरव दत्ताने संगीतबद्ध केला आहे.  गौरव, सनी एमआर आणि हरजोत कौर यांनी हे गीत लिहिले आहे. गाणं असं होतं, “ओ पिया, ओ पिया, चल चलें. बात लीन गम-खुशी, साथ में .”

उदयपूरमध्ये रिसेप्शन

परिणीती आणि राघवने उदयपूरमध्ये मित्र आणि कुटुंबासाठी रिसेप्शनही आयोजित केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी परिणीती आणि राघवच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

परिणिती - राघव दिल्लीत

उदयपूरमध्ये विवाहित जोडपे म्हणून पहिल्यांदा दिसल्यानंतर काही तासांनी परिणीती आणि राघव सोमवारी दिल्लीत पोहोचले . 

सुरूवातीच्या वृत्तानुसार आहे की ते चंदीगडमध्ये मित्र आणि कुटुंबासाठी लग्नाचे रिसेप्शन आयोजित करतील, त्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये दोन रिसेप्शन होतील.

चंदीगड आणि दिल्लीतील रिसेप्शन रद्द

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार , चंदीगड आणि दिल्लीतील रिसेप्शन रद्द करण्यात आले आहेत आणि परिणीती आणि राघव आता 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत त्यांच्या मित्रांना एका भव्य रिसेप्शनमध्ये होस्ट करतील.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT