Pariniti Chopada-Raghav Chadha:  Dainik Gomantak
मनोरंजन

Pariniti Chopada Raghav Chadha Date Night: रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान परिणीती चोप्रा अन् राघव चड्ढा पुन्हा दिसले एकत्र, नेटकरी म्हणाले...

आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबईत एकत्रित पुन्हा स्पॉट झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Parineeti Chopra Raghav Chadha Spotted Together on Date Night: गेल्या काही काळापासून परिणीती चोप्रा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. परिणीतीचे नाव आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्याशी जोडले जात आहे. 

परिणीती चोप्रा लवकरच राघव चढ्ढासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. जरी या जोडप्याने याबद्दल काहीही उघडपणे स्पष्ट केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

रविवारीही परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा मुंबईतील वांद्रे येथे एकत्र स्पॉट झाले होते. रंजक गोष्ट म्हणजे यादरम्यान अभिनेत्री तिच्या अनामिकेत अंगठी घालताना दिसली ज्यामुळे या जोडप्याच्या साखरपुडा झाल्याची खळबळ उडाली आहे.

  • परिणीती आणि राघव डिनर डेटवर स्पॉट

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर स्पॉट झाले होते. रेस्टॉरंटमधून बाहेर येताच पापाराझींनी त्या दोघांचे फोटो क्लिक केले. यादरम्यान परिणीती चोप्रा जॅकेटसह काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.

तिने गुच्ची स्लिंग बॅग आणि पांढऱ्या स्नीकर्सने तिच्या लूकला पूर्ण केले तर राघव ग्रे शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये डॅशिंग दिसत होता.

विशेष म्हणजे राघवसोबत डेट नाईट एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेल्या परिणीती चोप्राच्या बोटात एक मोठी हिऱ्याची अंगठी नक्कीच दिसली होती. परिणिती आणि राघवची एंगेजमेंट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

याआधी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच व्हायरल झाले आहेत. यादरम्यान दोघांची चांगली बाँडिंग पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT