Paresh Rawal Dainik Gomantak
मनोरंजन

Paresh Rawal: 'माझी मुलं रणबीर किंवा आलिया असती तर...' नेपोटिझमवर परेश रावल स्पष्टच बोलले

Paresh Rawal: पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे की तो खूप मेहनती आणि खूप हुशार आहे.

दैनिक गोमन्तक

Paresh Rawal: बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून नेपोटिझमवर जोरदार चर्चा सुरू आहे. स्टार किड्सना चित्रपटात संधी मिळली की त्यांची त्यांच्या पालकांशी तुलना होऊ लागते. असंही म्हटलं जाते की स्टार किड्स असल्याने त्यांना सहज मिळत असल्याचे म्हटले जाते. आता यावर अभिनेते परेश रावल यांनी एका मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे.

गेल्या चार दशकांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीचा एक भाग आहेत आणि त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची मुले अनिरुद्ध आणि आदित्य रावल देखील अभिनयाच्या दुनियेत सक्रिय आहेत. पण परेश रावल यांनी आपल्या मुलांना कधीही चित्रपटांसाठी त्यांचे नाव वापरू दिले नाही. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या मुलांना चित्रपट मिळवून देण्यासाठी कधीही मदत केली नाही.

परेश रावल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत नेपोटिझन आणि त्यांच्या मुलांच्या मुद्द्यावर बोलले होते. अभिनेत्याने आपल्या मुलांना चित्रपट प्रकल्प मिळवून देण्यासाठी कधी मदत केली का असे विचारले असता परेश रावल यांनी त्याला नकार दिला आहे.

ते म्हणाले, 'माझी मुले स्वतःच्या आवडीनिवडी स्वतः घेतात आणि निर्णय घेतात. चुका केल्याशिवाय ते शिकणार नाहीत. त्याने माझ्याकडे येऊन विचारले तरच मी त्याला सल्ला देईन. त्यांनी मला विचारले नाही तर मी त्यांना काहीही सांगणार नाही. त्यांना स्वतःचा मार्ग शोधू द्या.

मला विश्वास आहे की जर त्याने चुका केल्या तर तो त्यांच्याकडून शिकेल. पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे की तो खूप मेहनती आणि खूप हुशार आहे. या जगात म्हणजेच बॉलिवूडमध्ये येण्यासाठी त्याने माझ्या नावाचा वापर केलेला नाही.

ते म्हणाले, 'माझी मुले स्वतःच्या आवडीनिवडी स्वतः घेतात आणि निर्णय घेतात. चुका केल्याशिवाय ते शिकणार नाहीत. त्याने माझ्याकडे येऊन विचारले तरच मी त्याला सल्ला देईन. त्यांनी मला विचारले नाही तर मी त्यांना काहीही सांगणार नाही. त्यांना स्वतःचा मार्ग शोधू द्या.

मला विश्वास आहे की जर त्याने चुका केल्या तर तो त्यांच्याकडून शिकेल. पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे की तो खूप मेहनती आणि खूप हुशार आहे. या जगात म्हणजेच बॉलिवूडमध्ये येण्यासाठी त्याने माझ्या नावाचा वापर केलेला नाही.

परेश रावल यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत व्यक्त करत याला चुकीचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'मला वाटतं की घराणेशाही निरुपयोगी आहे. माझा मुलगा रणबीर कपूर किंवा आलिया भट्ट इतका प्रतिभावान असता तर मी माझे सर्व पैसे त्याच्यावर गुंतवले असते. आणि का नाही करणार. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर नाही बनणार तर नाव्ही बनेल का? जे लोक नेपोटिझमवर टीका करतात, त्यांना विचारा ते आपला वारसा आनंदाने का मिरवतात शेजारांना का देत नाहीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT