Parineeti Chopra | Raghav Chadha Dainik Gomantak
मनोरंजन

Parineeti Chopra-Raghav Chadha Engagement :राघव- परिणितीचा साखरपुडा संपन्न..फोटो व्हायरल

Rahul sadolikar

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आज, १३ मे रोजी राघव चढ्ढासोबत साखरपुडा केला. तिने आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांचा भावी जोडीदार म्हणून निवड केली . त्यांचा एंगेजमेंट सोहळा दिल्लीत पार पडला.

 हा सोहळा फक्त त्यांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला प्रियंका चोप्रा आणि मनीष मल्होत्रा ​​यांसारख्या शोबिज जगतातील काही दिग्गजांनीही हजेरी लावली होती. परिणीती आणि राघवच्या एंगेजमेंटचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.

गेले कित्येक दिवस परिणिती आणि राघव यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मिडीयावर होत होत्या. आणि अखेर आज दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घालत साखरपुड्याचा विधी पूर्ण झाला.

दोन महिन्यांपूर्वीच राघव - परिणिती एका ठिकाणी स्पॉट झाले होते तेव्हाच सोशल मिडीयावर या नात्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दोघांच्या नात्याविषयी कुठलीच अधिकृत माहिती मिळत नव्हती.

परिणिती आणि राघव चड्ढा एकमेकांना कॉलेजपासून ओळखत असल्याची माहिती मिळतेय. दोघे परदेशातही एकत्र शिक्षण घेते होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते दोघं एकत्र होते आणि तेव्हापासून ते एकमेकांचे मित्र होते असे कळते आहे

राघव- परिणितीच्या नात्याची सुरूवात नेमकी कधी झाली? हे सांगता येत नसले तरी रेशमी बंध जुळण्याची सुरूवात परदेशातल्या त्यांच्या शिक्षणापासुन झाली असं म्हणता येईल.पण राघव चढ्ढा जेव्हा पंजाबच्या दौऱ्यावर होते तेव्हा परिणितीचं शूटही तिथेच सुरू होतं, याचवेळी दोघांनी एकमेकांना पसंत केलं अशीही चर्चा आहे.

दोघांनी यावर बोलणं पूर्णत: टाळलं होतं. गेले काही दिवस ही सगळी चर्चा सुरू असताना आता दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज संध्याकाळी साखरपुड्याचा हा सोहळा पार पडला आहे. अजुनतरी विवाह सोहळ्याची तारीख कळू शकली नसली तरी साखरपुडा पार पाडल्यानंतर नक्कीच परिणिती आणि राघव यांच्या बोहल्यावर चढण्याची तारीख दोघांच्या चाहत्यांना समजू शकेल.

 या सोहळ्यात सिने जगतातील आणि राजकारणातील जवळपास 100 पाहुणे सहभागी झाले होते. लंडनहून परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्राही शनिवारी दिल्लीत पोहोचली. करण जोहर आणि मनीष मल्होत्राही या सोहळ्याला उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून परिणीती आणि राघवच्या डेटींगच्या बातम्या सतत येत आहेत. 

दोघेही यावर कधीच उघडपणे बोलले नसले तरी ते कधी लंच तर कधी एकत्र जेवण करताना दिसले. याशिवाय दोन्ही आयपीएल मॅचेसही एकत्र एन्जॉय करताना दिसले. परिणीती 9 मे रोजी तिचा मित्र राघव चंदासोबत दिल्लीला पोहोचली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT