सध्या मनोरंजन आणि राजकारण क्षेत्रात एका साखरपुड्याची चर्चा सुरू आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची एंगेजमेंट दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे, ज्याची जय्यत तयारीही सुरू आहे. बॉलिवूडमध्ये बराच काळ काम करणाऱ्या परिणितीबद्दल असे म्हटले जाते की, ती करोडोंची मालकिन आहे.
पण राघव चढ्ढा हे सुद्धा काही कमी नाहीत सीए ते देशातला सर्वात तरुण खासदार असा त्यांचा प्रवास आहे. चला तर जाणुन घेऊया परिणितीच्या भावी जोडीदाराची मालमत्ता किती आहे. हा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडतो .मग वाचाच राज्यसभा खासदार आणि आप नेते राघव चढ्ढाविषयीच्या संपत्तीविषयी …
राघव चढ्ढा यांनी 2012 मध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला होता आणि पक्षात प्रवेश करताच त्यांना पक्षाचे कोषाध्यक्ष बनवण्यात आले होते. याचे मुख्य कारण म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी राघव चार्टर्ड अकाउंटंट होते . 2016 मध्ये ते काही काळ मनीष सिसोदिया यांचे सल्लागारही होते
2018 मध्ये त्यांना पक्षाने दक्षिण दिल्लीचे प्रभारी बनवले आणि 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली पण रमेश बिधुरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
फेब्रुवारी 2020 मध्ये, त्यांनी दिल्लीच्या राजिंदर नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि निवडणुक जिंकून ते आमदार बनले. 2021 मध्ये, पक्षाने त्यांना पंजाबमधून राज्यसभेच्या खासदारासाठी नामनिर्देशित केले आणि ते राज्यसभेचे सर्वात तरुण सदस्य बनले.
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी राघव चढ्ढा यांच्या मालमत्तेची माहिती दिली होती. त्यानुसार 2020-21 मध्ये त्यांच्याकडे एकूण 36 लाख 99 हजार 471 रुपयांची संपत्ती आहे. त्यांनी आपले एकूण उत्पन्न 2 लाख 44 हजार 600 रुपये दाखवले आहे.
राघव चढ्ढा यांनी दिलेल्या जंगम मालमत्तेच्या तपशीलानुसार, त्याच्याकडे 30,000 रुपये रोख आहेत, एकूण 14,57,806 रुपये पाच बँक खात्यांमध्ये आहेत. बाँड, डिबेंचर्स आणि शेअर्स इत्यादींमध्ये त्यांनी एकूण 6 लाख 35 हजार 437 रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी विम्याच्या नावावर 52,839 रुपये गुंतवले आहेत.
राघव चढ्ढा यांच्याकडे मारुती स्विफ्ट डिझायर कार आहे ज्याची किंमत 2019 मध्ये 1 लाख 32 हजार रुपये आहे.
त्यांच्याकडे 90 ग्रॅमचे दागिने असून त्याची किंमत 4 लाख 95 हजार रुपये आहे. त्याच वेळी, 8 लाख 96 हजार 389 रुपये इतर मालमत्तांच्या रूपात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.