Pankaj Tripathi in IFFI  Dainik Gomantak
मनोरंजन

Pankaj Tripathi in IFFI : अॅक्टिंग करणं डोक्यातही नव्हतं; मात्र तो टर्निंग पॉईंट आला आणि सगळंच बदललं

पणजीत आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या इफ्फीमधील मास्टरक्लासमध्ये आपल्या वेगळ्याच अंदाजात पंकज त्रिपाठी यांनी आजवरच्या प्रवासावर सडेतोड भाष्यही केलं. यावेळी त्यांनी आपल्या इंडस्ट्रीमधील ट्रगलचाही उल्लेख केला.

आदित्य जोशी

Pankaj Tripathi in IFFI : अॅक्टिंग करणं डोक्यातही नव्हतं; मात्र तो टर्निंग पॉईंट आला आणि सगळंच बदललं असं म्हणत प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील एन्ट्रीवर दिलखुलास गप्पा मारल्या. पणजीत आयोजित करण्यात आलेल्या 53 व्या इफ्फीमधील मास्टरक्लासमध्ये आपल्या वेगळ्याच अंदाजात पंकज त्रिपाठी यांनी आजवरच्या प्रवासावर सडेतोड भाष्यही केलं. यावेळी त्यांनी आपल्या इंडस्ट्रीमधील ट्रगलचाही उल्लेख केला.

अभिनय करण्याचा कोणताही विचार नव्हता. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे शेती करणं हा एक पर्याय नेहमीच खुला होता. पण शेती घरचीच होती सो तो शेवटचा पर्याय ठेवला होता. पुजारी व्हायचंही ठरवलं होतं. एक काळ असा होता की डॉक्टर व्हायचाही विचार मनात डोकाऊन गेला. इतकंच नाही तर नेता बनायचंही ठरवलं होतं, म्हणून स्टुडंट युनियनमध्ये गेला. जेलचीही हवा खाल्ली. अभिनय सोडून सगळंच करायचं होतं. बारावीनंतर एका टर्निंग पॉईंटमुळे अभिनयाकडे वळल्याचं पंकज त्रिपाठींनी सांगितलं.

कुटुंबाने अभिनय क्षेत्रात येताना विरोध केला नाही का असं विचारताच आपल्या मिश्कील कोटीत त्यांनी उत्तरंही दिलं. कुटुंबीयांचा कधीच माझ्या अभिनयाला विरोध नव्हता कारण त्यांना ट्रगल कुठे माहित होतं, असं म्हणत पंकज त्रिपाठींनी एकच हशा पिकवून दिला. सल्ला कुणाचा घेता यावर सल्ले देणारे खूप मिळतात. इतकंच काय जेव्हा मुंबईत आलो तेव्हा मला भाजीवाल्यानेही मिशी वाढवण्याचा सल्ला दिला होता. मात्र रिअल लाईफमध्ये फक्त बायकोचाच सल्ला मानतो, असं सांगत या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

पहिल्या ब्रेकबद्दल बोलताना पंकज त्रिपाठी यांनी एक गमतीशीर किस्सा सांगितला. आपण हॉस्टेलमध्ये झोपलो होतो. एक कलाकार आला नव्हता आणि ज्यांनी मला संधी दिली त्यांना माहित होतं की मी विनोदी भूमिका चांगली करतो. त्यामुळे कास्टिंग झोपेतच झालं आणि त्यानंतर आयुष्यात परत कधीच कास्टिंगसाठी वेळ आली नाही. पहिल्या ब्रेकनंतर सतत ब्रेक मिळत गेला आणि काम करतच राहिलो, कधी मागे वळून पाहिलंच नाही, अशा शब्दात पंकज त्रिपाठींनी आपल्या अभियन क्षेत्रात येण्याचा टर्निंग पॉईंट सांगितला.

पहिला ब्रेक मिळाल्यानंतरही 8 वर्ष काम नव्हतं. मात्र या काळात कधीही नकारात्मक विचार मनात येऊ दिले नाहीत. हा वेळ स्वत:ला तयार करण्यासाठी, क्राफ्टिंग करण्यासाठी दिला आणि आज तुमच्यासमोर उभा आहे, असं त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. सध्या आयुष्यात सगळ्या सिरीजच सुरु असून पार्ट 1, पार्ट 2 असंच सगळं चाललंय म्हणत आपण सध्या विविध प्रोजेक्ट्समध्येही किती व्यस्त आहे, ते श्रोत्यांना सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

SCROLL FOR NEXT