IFFI Goa 2022 : कार्निव्हलसारखा नको; इफ्फी राजकारण विरहित आणि दर्जेदार व्हावा

‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात समीक्षक ज्ञानेश मोघे, सचिन चट्टे यांचे परखड मत
IFFI 2021 big opening ceremony in Goa
IFFI 2021 big opening ceremony in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Latest News IFFI 2022: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात आल्याने चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या वाढली याबाबत दुमत नाही. परंतु 2004 नंतर त्याच पठडीत हा महोत्सव होत आहे. त्यात फारसा मोठा बदल दिसत नाही. परंतु जागतिक स्तरावरील चांगले चित्रपट पहायला मिळतात, ही एक जमेची बाजू आहे. खर्चाची रक्कम वाढून महोत्सवाला कार्निव्हलचे स्वरूप देण्यापेक्षा दर्जेदार आणि राजकारण विरहीत महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा गोमन्तक टीव्हीच्या ‘सडेतोड'' नायक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सिनेमा समीक्षकांनी व्यक्त केली.

गोमन्तक टीव्हीचे संपादक-संचालक राजू नायक यांनी ‘इफ्फीची आत्तापर्यंतची वाटचाल'' याविषयावर नाट्य समीक्षक सचिन चट्टे आणि समीक्षक तथा नाटककार ज्ञानेश मोघे यांच्याशी त्यांनी चर्चा घडवून आणली. त्यात चट्टे यांच्या मते इफ्फी होतोय, त्याला पंधरा-सोळा वर्षे झाली, तरी त्यात फारसा बदल झालेला दिसला नाही. जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्तान मिळतात.

इफ्फीचा झगमगाट सुरुवातीला असतो, त्यानंतर चित्रपट पाहण्यातच वेळ जातो. पंधरा वर्षांत जेवढी कोकणी चित्रपट निर्मिती झाली ती इफ्फीमुळे. गोव्यातील युवकांनी निर्माण केलेले ‘सॉल्ट'' आणि ‘सदाबहार'' हे लघुपट नेटफ्लिक्सवर आल्या, हे मोठे यश आहे.

‘इफ्फी’बद्दल आपणास आदर आहे. परंतु गोव्यात 50 वर्षे जो चित्रपट पाहण्याचा जे अंतर पडले होते, ते इफ्फीमुळे नष्ट झाले. अनेकांनी इफ्फीमुळे चित्रपट निर्माण झाले, सात-आठ चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. बरे चित्रपट पाहणे आणि ते समजून घेण्याची जान येथील लोकांमध्ये आली, ते महत्त्वाचे आहे. सिनेमा पाहण्याची सवय अनेकांना झाली आहे. व्यावसायिक चित्रपट पाहण्याची अनेकांची सवय मोडली आहे, असे मोघे यांना वाटते.

गोव्यातील युवकांनी जे आंतरराष्ट्रीय लघुपट निर्माण केले. त्यांना बाहेर जाऊन त्याविषयी शिक्षण घ्यावे लागते. याठिकाणी त्यापद्धतीची सुविधा नाही.

कला व संस्कृती खात्याने युवकांना चित्रपटांविषयी ज्ञान मिळावे म्हणून काही उपक्रम सुरू केले होते, पण त्यानंतर चित्रपट महोत्सवाविषयी कार्यभार मनोरंजन संस्थेकडे त्यांनी ते उपक्रम बंद केले. सिनेमाविषयी लोकांना ज्ञान किंवा शिक्षण मिळावे, यासाठीचे उपक्रम काहीच राबविले गेले जात नाहीत, असे मोघे यांनी नमूद केले.

मनोरंजन संस्थेच्या भूमिकेविषयी ते म्हणतात, ईएसजीतर्फे विविध चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात. परंतु सिनेमा भाषा शिकण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित कराव्या लागतात. शिक्षणाचे एक माध्यम म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अशा एखादा आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करणे अपेक्षित असल्याच्या मतावरही समीक्षकांचे एकमत झाले.

IFFI 2021 big opening ceremony in Goa
Revolutionary Goans Ultimatum : वीरेश बोरकरांचा उपोषणाचा इशारा; आरजीची नेमकी मागणी काय?

एवढ्या खर्चाची गरज आहे का?

अर्थपूर्ण सिनेमा कसा पहावा, यासाठी कार्यशाळा आयोजित करणे आवश्‍यक आहे. महोत्सव संचालक हे आत्तापर्यंत त्यांच्याकडे या महोत्सवाची सूत्रे असते. त्यापैकी काही संचालकांना महोत्सवाची माहिती असते किंवा नाही.

गोव्याशिवाय डेकोरेशनचे कन्सेप्ट कोठेच नाही. मनोरंजन संस्थेत महोत्सवाच्या स्वरूपाची जाण असलेले दिसतच नाहीत. सरकारी हस्तक्षेप जोपर्यंत टळणार नाही, तोपर्यंत महोत्सवात दर्जेदारपणा येणार नाही.

कान एवढा मोठा का झाला, तर डेकोरेटिंगने तो मोठा झाला नाही. तेथे चित्रपटांची निवड महत्त्वाची ठरली, हे लक्षात घ्यायला हवे, असे मत समीक्षकांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com