Bhushan dance Panchayat  Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: 'पंचायत'च्या भूषण भय्याने केला भोजपुरी गाण्यावर 'माइकल जॅक्सन' डान्स; पाहून चाहते दिवाने

Panchayat Bhushan dance video: विजयाच्या या आनंदात त्याने असा जबरदस्त डान्स केला की, त्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे

Akshata Chhatre

Panchayat Bhushan Viral Video: प्राइम व्हिडीओवर सध्या 'पंचायत' वेबसिरीजचा बोलबाला आहे. फुलोरा गावातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे, पण या वेळी बनराकस म्हणजेच भूषण या भूमिकेने अक्षरशः शो जिंकून घेतल्याच्या चर्चा आहेत. आमदारजी आणि आपल्या सगळ्या युक्त्या वापरून अखेर प्रधानकीची निवडणूक जिंकलेल्या भूषणचा आनंद गगनात मावत नव्हता. विजयाच्या या आनंदात त्याने असा जबरदस्त डान्स केला की, त्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

बनराकसचा मायकेल जॅक्सन ते 'हिरोईन ओ हिरोईन'पर्यंतचा डान्स प्रवास!

व्हायरल झालेल्या या डान्स व्हिडिओमध्ये आमदारजी आणि विनोद यांच्या डान्स स्टेप्सची खूप चर्चा झाली, पण यांच्यात बनराकसही मागे राहिला नाही. त्याने मायकेल जॅक्सनची सिग्नेचर स्टेप करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पण आता बनराकसचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि हा व्हिडिओ बनराकसची भूमिका साकारणारे जबरदस्त अभिनेते दुर्गेश कुमार याचा आहे.

एका सोशल मीडिया यूजरने दुर्गेश कुमार यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो 'हिरोईन ओ हिरोईन' या भोजपुरी गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहेत. त्याची बेधडक डान्स स्टाइल प्रेक्षकांना खूप आवडली असून, हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

या व्लॉगरने 'पंचायत ४' च्या शूटिंगदरम्यानचे अनेक बियॉन्ड द सीन्स व्हिडिओही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यापैकीच एक व्हिडिओ शेवटच्या भागातील डान्स सिक्वेन्सचा आहे, ज्यात भूषणची भूमिका साकारणारे दुर्गेश कुमार जबरदस्त नाचताना दिसत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शूटिंगदरम्यानचा हा व्हिडिओ शोमध्ये प्रसारित झाल्यानंतर आणखी जास्त व्हायरल झाला आहे. यावरून प्रेक्षकांना हा शो आणि त्यातील पात्रे किती आवडतात हे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT