Palak Tiwari: बॉलीवू़डचा भाईजान अर्थात सलमान खान सध्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या पलक तिवारीने केलेल्या एका विधानामुळेदेखील सलमान खान चर्चेत आहे.
पलक तिवारीने सलमानच्या सेटवर मुलींसाठी काही नियम असल्याचे म्हटले होते. मुलींना डिप नेकलाईन ड्रेस घालण्यास मनाई आहे. मुलींनी पूर्ण कपडे घातलेले सलमानला आवडतात, असे पलक तिवारीने म्हटले होते.
आता मात्र एका मुलाखतीदरम्यान, मला चूकीचे समजले गेले. माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता असे पलकने म्हटले आहे. तिने म्हटले आहे की, मी माझ्या सिनिअर्स समोर कसे राहायचे याचे माझे स्वत:चे काही नियम आहेत.
मी या सगळ्यांना बघत मोठी झाले आहे. माझ्यासाठी आदर्श असणाऱ्या व्यक्तींसमोर मी कसे राहणार याचे माझे काही नियम आहेत असा म्हणण्याचा अर्थ आहे. मी बोललेल्या गोष्टींचा चूकीचा अर्थ घेतला आहे असे पलक तिवारीने आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे.
काय म्हणाली होती पलक तिवारी?
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने सिद्धार्थ कन्ननने घेतलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, सलमान खानने त्याच्या सेटवर महिलांनी कसे कपडे घालावेत याचा नियम आहे. पलक म्हणाली, मला वाटत नाही की हे फार लोकांना माहीत आहे.
जेव्हा मी अंतीम चित्रपटासाठी सलमान सरांसोबत प्रमोशन करत होते तेव्हा सलमान सरांचा एक नियम होता. माझ्या सेटवर कोणत्याही मुलीने पूर्ण कपडे घालायला हवे. महिलांसाठी असे नियम का आहेत? असे विचारले असता सलमान खानबद्दल पलक म्हणाली, "तो एक परंपरावादी आहे अर्थातच तो म्हणतो, तुम्हाला जे पाहिजे ते घाला पण माझ्या मुलींचे नेहमीच संरक्षण केले पाहिजे असे सलमानचे मत असल्याचे पलकने म्हटले होते. आता मात्र आपण केलेल्या वक्तव्याचा चूकीचा अर्थ काढला गेला असे तिने म्हटले आहे.
दरम्यान, पलक तिवारी किसी का भाई किसी की जान या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तिच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत बिग बॉस फेम शहनाज गिल आणि प्रसिद्ध डान्सर राघव जुयाल या चित्रपटात दिसून येणार आहे. आता सलमानचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.