OTT Platform
OTT Platform Dainik Gomantak
मनोरंजन

OTT Platform and Cinema : मोठमोठ्या कलाकारांना भुरळ पाडतोय ओटीटी प्लॅटफॉर्म

दैनिक गोमन्तक

सिनेमा भारतीय लोकांसाठी एका रंगीत स्वप्नासारखा पुर्वीही होता आणि आताही आहे. आपले रोजचे ताण- तणाव विसरुन थोडा वेळासाठी रंगीत जगात रमुन जातात. आजही प्रेक्षकांचं सिनेमावरचं प्रेम कमी झालं नसलं तरी सिनेमा मात्र गेल्या काही वर्षात बराच बदलला आहे.

चित्रपटांच्या कथानकापासुन ते त्याच्या रिलीज होण्याच्या प्लॅटफॉर्मपर्यंत सगळ काही बदललेलं आपण पाहु शकतो. अलीकडे सिनेमा छोट्या स्क्रिनवर आला. पुर्वी मोठ्या पडद्यावर दिसणारा सिनेमा आता आपल्याला मोबाईलवर पाहता येतो.

दर्जेदार सिनेमा छोट्या स्क्रिनवर बघायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि म्हणुनच आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हा चांगला पर्याय असल्याचं मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच आता ओटीटी प्लॅटफॉर्मचे कलाकारांंमधले आकर्षण अलीकडे वाढलेले दिसते.

गेल्या महिन्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर ( Madhur Bhandarkar) आणि दिग्दर्शक प्रकाश राज (Prakash raj) यांच्या दोन वेब फिल्म्स ओटीटीवर रिलीज झाल्या. अभिनेत्री तापसी पन्नु हिचा निर्माता आणि दिग्दर्शक म्हणुन येत असलेला सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ओटीटीवरच रिलीज व्हावा यासाठी तापसी आग्रही आहे. सध्या ओटीटीवर खाकी : बिहार चॅप्टर सारख्या वेब सिरीज चर्चेत आहेत.

कथानक, अभिनय आणि तांत्रिक अंगानेही सशक्त असणाऱ्या या कलाकृतींचा आनंद प्रेक्षक घेताना दिसतात. 2019 हे साल संपुर्ण जगाच्या दृष्टीने न भुतो न भविष्यती असंच होतं . महामारीच्या या काळात बऱ्याच क्षेत्रात मोठे बदल झाले. त्यात मनोरंजन आणि त्याची माध्यमं यांच्यातही मोठे बदल झाले. सिनेमाघरात जाऊ न शकणारे प्रेक्षक ओटीटीवर स्थिरावले त्यामुळे साहजिकच कलाकारांना आपली अभिव्यक्ती ओटीटीवर व्यक्त व्हावं लागेल.

ओटीटवर नवेनवे विषय आणि कथा प्रेक्षक पसंत करतायत. वेब सिरीज आणि वेब फिल्म्स कलात्मकता आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी होताना दिसतोय हे मात्र नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT