Kevin Spacey Court Case Dainik Gomantak
मनोरंजन

Kevin Spacey Court Case : आणि मग लैंगिक शोषणाचे आरोप असलेला ऑस्कर विजेता अभिनेता कोर्टात ढसाढसा रडला...

हॉलीवूडचा ऑस्कर विजेता अभिनेता केवीन स्पेसी लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे गेले काही काळ चर्चेत होता.

Rahul sadolikar

Kevin Spacey found not guilty on all nine charges : मनोरंजन विश्वात लैंगिक शोषणाचे आरोप होणं ही तशी नवीन गोष्ट नाही ;पण जेव्हा एक ऑस्कर विजेता अभिनेता पुरुषांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे कोर्टात उभा राहतो तेव्हा खटल्याचं गांभीर्य वाढतं. आम्ही बोलतोय प्रसिद्ध अमेरीकन अभिनेता केवीन स्पेसीबद्दल. काय आहे हा खटला आणि कोर्टात काय झालं चला पाहुया..

केवीन स्पेसी कोण?

ज्यांनी अमेरिकन ब्युटी हा चित्रपट आणि प्रसिद्ध हाऊस ऑफ कार्डस नावाची मालिका पाहिली असेल त्यांना केविन स्पेसी कोण हे सांगण्याची गरज नाही.ऑस्कर विजेत्या या अभिनेत्यावर झालेले लैंगिक अत्याचाराचे आरोप चाहत्यांसाठी धक्कादायक होते. आता या प्रकरणातली एक मोठी बातमी समोर आली आहे.

हॉलीवूडमध्ये केविन स्पेसीनं त्याच्या अभिनयानं वेगळी ओळख तयार केली होती. गेल्या काही वर्षांपासून त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. चार पुरुषांनी नऊ वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केविनवर केले होते. कोर्टामध्ये अनेक वर्षांपासून ही लढाई सुरु होती. या सगळ्यात कोर्टानं केविनला दिलासा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

आणि केवीन कोर्टातच रडू लागला...

कोर्टानं आपला निर्णय दिला आणि केविनला कोर्टातच रडू कोसळले. अमेरिकन अभिनेता केविनवर ब्रिटनमध्ये सुनावणी सुरु होती. त्याचा निकाल आता समोर आला आहे. केविनवर जे आरोप करण्यात आले त्यातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

2001 आणि 2013 दरम्यान चार पुरुषांनी केविनवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. यावर केविननं आपण यासगळ्यात निर्दोष असल्याचे म्हटले होते.

केवीनला दिलासा

आता कोर्टानं ६४ वर्षीय केविन स्पेसीला मोठा दिलासा दिला आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचार, शोषण आणि परवानगीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे याप्रकारचे आरोप होते. लंडनमध्ये झालेल्या या सुनावणीची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. सोशल मीडियावर देखील याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. न्यायधीशांच्या पीठानं केविनला निर्दोष ठरवल्यानंतर कोर्टात जे घडलं त्याची चर्चा सुरु आहे.

न्यायालयात झाला भावूक

कोर्टानं आपला निकाल देताच केविनला रडू कोसळले. तो न्यायालयातच कमालीचा भावूक झाला होता. साऊथवर्क क्राऊन कोर्टामध्ये गेल्या चार आठवड्यापासून हा खटला सुरु होता. 2004 ते 2013 मध्ये ब्रिटनमध्ये घडलेल्या त्या घटनेनं सगळ्यांना मोठा धक्का दिला होता. लंडनमधील ओल्ड विक थिएटरमधील त्या चार जणांनी केविनवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT