Nusrat Bharucha Dainik Gomantak
मनोरंजन

Israel War: इस्राइलमध्ये अडकली नुसरत भरुचा; युद्धभूमीवरुन भारतात परतण्यासाठी...

Israel War: मात्र आता इस्त्राइल आणि हमास यांच्यामधील तणावाच्या वातावरणात नुसरत भरुचाची टीम चिंताग्रस्त झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Israel War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघर्ष वाढताना दिसत आहे. आता यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकल्याची माहिती आहे. 'हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होण्यासाठी नुसरत भरुचा इस्रायलमध्ये गेली होती. २८ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा चित्रपट महोत्सव ७ ऑक्टोबरला संपला.

या चित्रपट महोत्सवात नुसरत भरुचाचा 'अकेली' हा चित्रपट दाखवण्यात आला. मात्र आता इस्त्राइल आणि हमास यांच्यामधील तणावाच्या वातावरणात नुसरत भरुचाची टीम चिंताग्रस्त झाली आहे.

वास्तविक, नुसरतची टीम गेल्या दिवसापासून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप ते नुसरतबरोबर संपर्क साधू शकले नाहीत. मिळालेल्या माहीतीनुसा, तिच्या टीममधील सदस्यांच्या म्हणण्यानुसार 'दुर्दैवाने नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे.

हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ही अभिनेत्री तिथे गेली होती. अभिनेत्रीच्या टीमचे म्हणणे आहे की, नुसरतशी काल दुपारी 12.30 वाजता शेवटचा संपर्क झाला होता तेव्हा ती सुरक्षित होती.

कालपासून तिच्याबरोबर पुन्हा संपर्क झालेला नाही. तिची संपूर्ण टीम नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती लवकरात लवकर भारतात सुखरूप परतावी अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर नुसरतचे चाहते चिंतेत पडले आहेत. कारण हमासने 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT