Nushrratt Bharuccha fell unconscious on the set while shooting due to blood pressure problem Twitter/@NariKesari
मनोरंजन

फिल्म सेटवरच कोसळली नुसरत भरुचा; डॉक्टरांनी दिला खास सल्ला

रक्तदाबाच्या (Blood pressure) समस्येमुळे शूटिंग करताना नुशरत भरुचा (Nushrratt Bharuccha) सेटवर बेशुद्ध (Vertigo) पडली.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडची (Bollywodd) सुंदर अभिनेत्री नुसरत भरुचाच्या (Nushrratt Bharuccha) चाहत्यांसाठी अतिशय त्रासदायक बातमी समोर आली आहे. रक्तदाबाच्या (Blood pressure) समस्येमुळे शूटिंग करताना नुशरत भरुचा सेटवर बेशुद्ध (Vertigo) पडली. या घटनेनंतर अभिनेत्रीला थेट रुग्णालयात नेण्यात आले. अभिनेत्री आजकाल प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजन यांच्या नवीन चित्रपटाचा एक भाग आहे. अभिनेत्री रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला पाहिले आणि सांगितले की, कमी रक्तदाबामुळे ती चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध पडली होती. ही संपूर्ण घटना पाहता डॉक्टरांनी अभिनेत्रीला चित्रपटाच्या शूटिंगमधून 15 दिवसांचा ब्रेक घेण्यास सांगितले आहे. (Nushrratt Bharuccha fell unconscious on the set while shooting due to blood pressure problem)

नुसरत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सतत शूटिंग करत आहे. जिथे या चित्रपटाचे 25 दिवसांचे शूटिंग पूर्ण झाले आहे. माध्यमांशी बोलताना अभिनेत्रीने असे म्हटले आहे. “मला वाटले की मी एक किंवा दोन दिवसात ठीक होईल, पण दुसऱ्या दिवशी माझी तब्येत बिघडली, मी सेटवर जाण्याचा निर्णय घेतला पण तिथे माझी तब्येत बिघडली त्यानंतर मला मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतरही माझी तब्येत खूपच खराब होती. त्यानंतर मला व्हील चेअरच्या मदतीने वरच्या मजल्यावर नेण्यात आले. माझा रक्तदाब 65/55 पर्यंत खाली आला होता.

अभिनेत्री पुढे म्हणाली की "मला ही बातमी समजताच माझे पालक रुग्णालयात पोहोचले, या घटनेचे पुढील 7 ते 8 दिवस खूप वाईट होते. मी रुग्णालयात राहिले नाही, मी घरी राहून माझी काळजी घेत आहे. माझी सर्व तपासणी झाली आहे, आता मला पूर्णपणे ठीक वाटत आहे. " अभिनेत्रीने सांगितले आहे की तिला चित्रपटाच्या सेटवर चक्कर आली होती. यामुळे ती बेशुद्ध पडली. नुसरत भरूचाच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाव्यतिरिक्त अभिनेत्री अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT