Janhit Mein Jaari Dainik Gomantak
मनोरंजन

Janhit Me Jaari Trailer Out: नुसरत भरुचा जणजागृतीसाठी पडली बाहेर पण...

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा आगामी चित्रपट 'जनहित में जारी'चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा (Nushrat Bharucha) आगामी चित्रपट 'जनहित में जारी'चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. आज अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून, 'जनहित में जारी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. कंडोम सेल्स गर्लच्या भूमिकेत नुसरत भरुचा पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. नुसरत व्यतिरिक्त यात पावेल गुलाटी, अन्नू कपूर, अनुद ढाका आणि परितोष त्रिपाठी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. (Nushrat Bharucha new Janhit Me Jaari movie trailer has been released)

सेल्सगर्ल म्हणून काम करणारी नुसरत भरुचा ही पैशाच्या बळजबरीने कंडोम विकण्याचे काम करत असते असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. सुरुवातीला अभिनेत्रीला (मन्नू) हे काम अजिबात आवडत नाही, पण हळूहळू तिला हे काम आवडू लागते आणि ती समाजातील लोकांची विचारसरणी बदलण्याचा निर्णय घेते. मात्र, कुटुंब आणि समाज दोघेही मन्नूच्या विरोधात उभे असतात. आणि अशाच परिस्थितीत मन्नूच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश होतो.

कंडोम विक्रेत्या बाईचे लग्न धूमधाने होते, पण खरी कहाणी सुरू होते जेव्हा त्याच कंडोममुळे मन्नूच्या लग्नात तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते. आता मन्नू तिच्या कुटुंबाच्या आणि प्रेमाच्या विरोधात जाऊन कंडोमच्या वापराबाबत लोकांना जागरुक करून घेण्याच्या कामात कितपत यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT