Lalitha Lajmi  Dainik Gomantak
मनोरंजन

Lalitha Lajmi : गुरुदत्त यांच्या बहीण, ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन

आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटात त्यांनी काम केले होते.

Pramod Yadav

Lalitha Lajmi: ज्येष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांनी वयाच्या 90 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्या एक प्रसिद्ध चित्रकार होत्या. त्यांनी आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात त्यांची खास भूमिका होती. ललिता लाजमी या प्रसिद्ध चित्रकार होत्या. जहांगीर निकोल्सन आर्ट फाऊंडेशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे.

फाउंडेशनने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'ललिता लाजमी जी यांचे निधन झाल्याची बातमी सांगताना आम्हाला खूप दु:ख होत आहे. त्या एक स्वयंप्रेरित कलाकार होत्या. त्यांना शास्त्रीय नृत्यात खूप रस होता. त्या खूप चांगले जीवन जगल्या व त्यांनी खूप काम देखील केले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.'

प्रसिद्ध कलाकार असण्यासोबतच ललिता जी यांनी बॉलिवूड चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट म्हणजे आमिर खानचा 'तारे जमीन पर', जो 2007 साली आला होता.

या चित्रपटात ईशान नावाच्या मुलाची कथा दाखवण्यात आली होती, ज्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता, आणि आमिर खानने शिक्षकाची भूमिका केली होती.

या चित्रपटाच्या एका शेवटच्या दृश्यात ललिता लाजमीही दिसल्या होत्या. या चित्रपटात त्या शालेय चित्रकला स्पर्धेत पाहुण्या म्हणून दिसल्या होत्या. या चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी असली तरी खूप खास होती.

सोशल मीडियावर ललिता लाजमी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

'त्या खूप छान महिला आणि संवेदनशील अभिनेत्री होत्या. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. अशा शब्दात एका चाहत्याने शोक व्यक्त केला आहे.

'मी 3 दिवसांपूर्वी त्यांच्या प्रदर्शनाला गेलो होतो.' असे एका चाहत्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT