Nora Fatehi opened up about her experience of filming Kusu Kusu for Satyameva Jayate 2 Dainik Gomantak
मनोरंजन

'कोणीतरी माझा गळा दाबत होतं' नोरा फतेहीने सांगितला भयानक अनुभव

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते, मात्र सध्या ती अभिनेत्री तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'कुसू कुसू' (Kusu Kusu) या गाण्यामुळे खूप चर्चेत आहे. नोराचे 'कुसु कुसू' हे जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते 2' चित्रपटातील गाणे आहे जे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि मग त्यात नोराच्या मुव्हसबद्दल काय बोलावे.

नेहमीप्रमाणे या गाण्यात नोरा तिच्या किलर मुव्हने सगळ्यांना वेड लावत आहे, पण तुम्हाला माहित आहे का की या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नोरासोबत असे काही घडले की ज्याचा अभिनेत्रीने विचारही केला नसेल. हे गाणे कितीही प्रेक्षणीय वाटले तरी, या गाण्याची पार्श्वभूमी नोरासाठी खूपच भीतीदायक आहे, कारण तिला कोणीतरी तिचा गळा दाबल्यासारखे वाटले.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात, नोराने या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला आणि सांगितले की, 'सेटवर सराव करताना, आपल्याला जखमा, पायातून रक्त येणे यासारख्या किरकोळ जखमा होत राहतात. पण माझ्यासोबत जे घडले ते मला सेटवर आलेला सर्वात वाईट अनुभव होता. वजनामुळे माझा हार खूप घट्ट झाला होता आणि मी सतत नाचत असल्यामुळे माझी मान चिटकत होती. मला असे वाटले की कोणीतरी माझा दोरीने गळा दाबला आहे आणि मला जमिनीवर ओढले आहे. पण शूटिंगसाठी आमच्याकडे मर्यादित वेळ असल्याने मी गाण्याचे चित्रीकरण सुरू ठेवले आणि सीक्वेन्स पूर्ण केल्यानंतरच ब्रेक घेतला.

जॉन इब्राहिमच्या 'सत्यमेव जयत 2' या चित्रपटात नोराचा डान्सिंग नंबर आहे, तर दिव्या कुमार मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप जाफरी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT