मनोरंजन

अबुधाबीच्या स्टेजवर नोरा फतेही सोबत झळकणार निक जोनास

दैनिक गोमन्तक

आपल्या डान्स स्टेप्सने सगळ्यांना वेड लावणारी बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) अबुधाबी (abu dhabi) येथील विडकॉन इव्हेंटमध्ये (Vidcon Event) परफॉर्म करणार आहे. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राचा (Actress Priyanka Chopra) पती आणि अमेरिकन गायक निक जोनास (Nick Jonas) देखील नोरासोबत स्टेज शेअर करणार आहे. हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम ३ डिसेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये निक आणि नोरोसह जगभरातील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात नोरो फतेही तिच्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीने नोराचे चाहते खूप उत्सुक आहेत.

नोराने यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर केली मोठी कामगिरी

नोरा फतेही तिच्या उत्कृष्ट डान्स मूव्ह्ससाठी ओळखली जाते. पॅरिसमधील L'Olympia Bruno Coquatrix येथे परफॉर्म करणारी नोरा ही पहिली बॉलीवूड सेलिब्रिटी ठरली आहे. येथे नोराने अरबी आणि भारतीय नृत्याच्या फ्युजनने लोकांची मने जिंकली होती. विशेष म्हणजे नोरा व्यतिरिक्त इतर कोणतीही बॉलीवूड सेलिब्रिटी ऑलिम्पियाच्या स्टेजपर्यंत पोहोचलेली नाही. चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. आता अबुधाबीमध्ये नोरा फतेही पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत आपले नृत्य कौशल्य दाखवणार आहे.

नोरा फतेहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अबू धाबीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. नोराने पोस्टसोबत लिहिले की, 'आता मी जास्त वेळ थांबू शकत नाही. मित्रांनो तुम्हाला 3 डिसेंबरला अबू धाबी येथे भेटणार आहे.

नोरा फतेहीचे खास गाण्यांसाठी वाढले महत्व

सध्या एक स्पेशल सॉंग ही जवळपास प्रत्येक चित्रपटाची गरज बनली आहे. जेव्हा जेव्हा चित्रपटातील अशा गाण्यांची चर्चा होते तेव्हा प्रत्येक चित्रपट निर्मात्याच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे नोरा. आत्तापर्यंत नोराने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये सलमान खानचा चित्रपट 'भारत' आणि अजय देवगणचा 'भुज' हे प्रमुख चित्रपट आहेत.

नोरा फतेही चित्रपटांव्यतिरिक्त रिअॅलिटी शोमध्येही दिसते. आणि अनेकदा तिच्या नृत्याने ती लोकांचे मनोरंजन करत असते. अलीकडेच तीने 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या मंचावर कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत एका रोमँटिक गाण्यावर डान्स केला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

कोने, प्रियोळ येथे भीषण अपघातात एक ठार; दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी 4 अपघात, गोव्यातील ठळक बातम्या

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

SCROLL FOR NEXT