Sushmita Sen Twitter
मनोरंजन

Sushmita Sen: 'ना लग्न... ना एंगेजमेंट', ललित मोदींसोबतच्या डेटिंगनंतर सुष्मिताने केली पहिली पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या लव्ह लाईफबद्दल प्रचंड चर्चेत आहे. सुष्मिता प्रसिद्ध उद्योगपती ललित कुमार मोदीला (Lalit Modi) डेट करत आहे.

दैनिक गोमन्तक

Sushmita Sen Reaction On Lalit Modi Affair: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या लव्ह लाईफबद्दल प्रचंड चर्चेत आहे. सुष्मिता (Sushmita Sen) सेन प्रसिद्ध उद्योगपती ललित कुमार मोदीला (Lalit Modi) डेट करत आहे. ललित मोदी यांनी नुकताच त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचा खुलासा केला आहे. ललित मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर दोघांचा चांगलाच बोलबाला आहे.

लोक सुष्मिता आणि ललित मोदींना वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स शेअर करून ट्रोल करत आहेत. आता या ट्रोलिंग दरम्यान सुष्मिता सेनने तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये ती तिच्या दोन्ही मुलींसोबत खूप आनंदी दिसत आहे. या पोस्टमध्ये सुष्मिताने हेही स्पष्ट केले आहे की, तिचे लग्न झालेले नाही आणि एंगेजमेन्ट पण झालेले नाही. अभिनेत्रीने असेही सांगितले की, तिने बरेच स्पष्टीकरण दिले आहे पण आता नाही!

मुलींसोबत फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'मी आनंदी ठिकाणी आहे...ना लग्न ना एंगेजमेन्ट...ना प्रतिबद्धता. जे माझ्यावर बिनशर्त प्रेम करतात त्यांच्यासोबत मी आहे. बरेच स्पष्टीकरण दिले ... आता पुन्हा कामाला लागायचे आहे.'

दरम्यान कालपासून सोशल मीडियावर फक्त दोनच नावांची सर्वाधिक चर्चा आहे. यामध्ये पहिले नाव बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचे आणि दुसरे नाव आयपीएलचे चेअरमन ललित कुमार मोदी यांचे आहे. काल म्हणजेच 14 जुलै रोजी ललित कुमार मोदी यांनी घोषणा केली की ते आणि सुष्मिता सेन एकमेकांना डेट करत आहेत. ललितने सुष्मितासोबतचे संबध उघड करणारे दोन बॅक टू बॅक ट्विट केले आणि ललित मोदींच्या दोन्ही ट्विटने सोशल मीडियावर आगपाखड केली. सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आणि या दोघांच्या लग्नाच्या अफवा सर्वत्र पसरल्या. मात्र, नंतर ललित मोदींनी लग्न न केल्याचे स्पष्ट केले. आणि आज सुश्मितानेही लग्न न केल्याचे सांगितले.

1994 या वर्षीची मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन बॉलीवूडमधील एक आदर्श सिंगल मदर ओळखली जाते. लग्न न करताच एका मुलीला दत्तक घेऊन सुश्मिता त्यावेळी एक कौतुकाचा विषय ठरली होती. रिनी सेन ही तिने दत्तक घेतलेली पहिली मुलगी. त्यानंतर काही वर्षांनी तिने आणखी एक मुलगी दत्तक घेतली. तिचं नाव अलिशा आहे. रिनी आणि अलिशा या दोघीही आयुष्यात आल्या आणि त्यांनी माझं आयुष्य आणखी सुंदर केलं, असं ती नेहमीच म्हणते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT