Nitin Desai Suicide Case Dainik Gomantak
मनोरंजन

Nitin Desai Suicide Case : त्या 11 ऑडिओ क्लिप्स सापडल्या, नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग

Rahul sadolikar

Police got Audio Clips of Nitin Desai : ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांना आधी व्हॉईस नोट मिळाली आणि आता त्यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले 11 ऑडिओ मिळाले आहेत. 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये त्या लोकांचीही नावे आहेत ज्यांच्यावर नितीन देसाई नाराज होते. सध्या हा ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

11 ऑडिओ क्लिप्स सापडल्या

बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अलीकडेच पोलिसांनी नितीन देसाई यांच्या खोलीतून एक व्हॉईस नोट जप्त केली असून, आता 11 ऑडिओ क्लिप सापडल्या आहेत.

 पोलीस आता या 11 ऑडिओ क्लिपच्या आधारे तपास पुढे करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ऑडिओ रेकॉर्डर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाईने काही क्लिपमध्ये अशा लोकांची नावे सांगितली आहेत ज्यांच्यावर तो नाराज होता. मात्र पोलिसांनी अद्याप या लोकांची नावे उघड केलेली नाहीत.

गाजलेल्या चित्रपटांचं केलं होतं कलादिग्दर्शन

'लगे रहो मुन्ना भाई', 'दोस्ताना', 'जोधा अकबर', 'देवदास' आणि 'हम दिल दे चुके सनम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केलेले नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी त्यांच्या एनडी स्टुडिओ कर्जत येथे आत्महत्या केली . त्यांचा मृतदेह स्टुडिओत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

वित्तीय कंपन्यांच्या धोरणांमुळे टोकांचं पाऊल

पोलीस तातडीने या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करत आहेत. आता 11 ऑडिओ क्लिप मिळविण्यासाठी खळबळ उडाली आहे. ऑडिओ रेकॉर्डरच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाची दिशा बदलू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 11 ऑडिओ क्लिपपैकी एका ऑडिओ क्लिपमध्ये नितीन देसाई यांनी सांगितले आहे की, वित्तीय सेवा कंपनीने अवलंबलेल्या प्रक्रियेमुळे त्यांची कंपनी आर्थिक संकटातून बाहेर पडू शकली नाही. 

ऑडिओमध्ये नेमकं काय आहे?

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यातील काही ऑडिओ 4 मिनिटांचे आहेत तर काही 20 मिनिटांचे आहेत. यामध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या आयुष्याची कहाणीही सांगितली आहे. त्याने इतके पैसे कसे कमावले आणि कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले हे सांगितले आहे.

एन.डी स्टुडिओ सील केला जाण्याची शक्यता होती

नितीन देसाई हे अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात होते आणि त्यांच्यावर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते, असे सांगण्यात येत आहे. एनडी स्टुडिओ विकत घेतल्यानंतर नितीन देसाई यांनी 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, पण ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे ते 250 कोटी इतके झाले हो ते. तसेच एनडी स्टुडिओ सील केला जाण्याची शक्यता होती आणि कोर्ट केस चालू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT