Instagram/@missnisharawal
and 
realkaranmehra
Instagram/@missnisharawal and realkaranmehra
मनोरंजन

Nisha Karan Case: "माझ्या मुलांची आणि माझी काळजी घेण्यास संक्षम आहे"

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री निशा रावल (Actress Nisha Rawal) आणि करण मेहरा (karan Mehra) यांच्यामध्ये दोन महिन्यापूर्वी मोठा वाद झाल्याने ते दोघे वेगळे झाले आहेत. निशाने घरगुती हिंसाचार (Domestic violence) आणि फसवणुकीचा आरोप करत करण मेहराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हा करण ला अटकही झाली होती. त्यानंतर निशाने करण मेहराबद्दल आणखी काही धक्कादायक खुलासे केले होते. त्या दोघांना एक मुलगाही आहे ज्याच्यासोबत करणचा 14 जून रोजीपासून संपर्क नाही करण आणि निशाच्या मुलाचे नाव कविश (Kavish) आहे ज्याच्या सोबत करणचा फोनवरही कॉटॅक्ट (Contact) बंद आहे.

दरम्यान करणकडून कोणतीही देखभाल नको, ती स्वतः तिच्या मुलाची काळजी घेण्यास सक्षम आहे, असे निशा रावलने (Nisha Rawal) म्हटले आहे. निशाने एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिने आणि तिच्या वकिलाने करण मेहराला (karan Mehra) मुलाच्या कस्टडीबद्दल (Custody Notice) नोटिस पाठवली होती. त्यात तिने कविशची कस्टडी मागितली आहे. तसेच मुलाचे वडील म्हणून करणला नियमितपणे आपल्या मुलाला भेटता येणार असे त्या नोटीसमध्ये (Notice) लिहीले आहे.

* मला पोटगीची गरज नाही- निशा रावल

निशा रावल म्हणाली की, मला कोणतीही पोटगी नको. तो मला काय देणार जे मी त्याला दिले नाही? आम्ही सोबत मिळून सर्वकाही बनवले आहे. मी खूप लहान वयात कमावायला सुरुवात केली आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या सिरीयलमध्ये तो येण्यापुर्वी मी त्याला पाठिंबा दिला होता. मी खूप काम केले आहे त्यामुळे मला त्याच्या पोटगीची गरज नाही.

* करणकडे मालमत्तेची कागदपत्रे

करण लग्नाच्या वेळी मिळालेले सर्व दागिने घेवून गेला आहे असा आरोप निशाने करणवर केला. त्याने हे सगळे कागदपत्र परत करावे जेणेकरून ती नव्याने आपल्या मुलासोबत आयुष्य सुरू करेल असे तिने सांगितले आहे. करणने एवढेच नव्हे तर तीच्या आईच्या मालमत्तेचे कागदपत्रेसुद्धा नेले आहेत जे त्याने परत करावे असे निशा म्हणाली, "मी माझ्यासाठी काहीही मागत नाही. मी एक स्वतंत्र मुलगी आहे तेव्हा मी माझ्या मुलांची आणि माझी काळजी घेण्यास संक्षम आहे,"

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT