Amir Khan  Danik Gomantak
मनोरंजन

Amir Khan: 'आधी व्यसनं बंद करा' लाइव्हमध्येच नेटकऱ्याने आमिर खानला केले ट्रोल

Amir Khan: आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा आपल्या लाइव्ह सेशनमुळे मोठ्या चर्चेत आला आहे.

दैनिक गोमन्तक

Netizens trolled Amir Khan during live

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते आपल्या चित्रपटांमुळे, कधी ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या चर्चेत असतात. आता बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा आपल्या लाइव्ह सेशनमुळे मोठ्या चर्चेत आला आहे.

आमिर खानने नुकताच सोशल मिडियावर लाइव्ह येत आपल्या चाहत्यांबरोबर संवाद साधला. त्याची एक्स-वाइफ किरण राव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'लापता लेडिज' या चित्रपटाबद्दल आमिर खानने आपल्या चाहत्यांबरोबर संवाद साधला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याप्रकारचे आणखी चित्रपटांची निर्मिती व्हावी असे मतदेखील त्याने यावेळी व्यक्त केले.

यादरम्यान, अभिनेता पाइपमधून कशाचेतरी सेवन करत असल्याचे लाइव्ह व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले. हे पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने, आधी ड्रग्ज घेणे बंद करा अशा प्रकराची कमेंट केल्याचे पाहायला मिळाले. ही कमेंट वाचल्यानंतर अभिनेत्याने, काहीही काय बोलताय अशा आशयाचे उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आणखी एका नेटकऱ्याने असेही विचारले की, आमिरने त्याची मुलगी आयरा खानच्या लग्नात डान्स केला नाही, तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये तो डान्स करताना दिसला. यावर अभिनेत्याने उत्तर दिले की, अंबानी हे त्याच्यासाठी कुटुंबासारखे आहे. मी माझ्या मुलीच्या लग्नात आणि मुकेशच्या मुलाच्या लग्नातही डान्स केला कारण मुकेश माझा खूप जवळचा मित्र आहे. मुकेश, नीता आणि त्यांची मुले माझ्यासाठी कुटुंबासारखी आहेत. मी त्यांच्या लग्नात डान्स करतो आणि तेदेखील माझ्या कार्यक्रमात डान्स करतात.

यादरम्यान, 'सितारे जमीन पर' या त्याच्या आगामी चित्रपटाविषयीदेखील त्याने संवाद साधला आहे. १४ मार्चला पुन्हा चाहत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी लाइव्ह येणार असल्याचेदेखील त्यांना चाहत्यांना म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT