Jawan's Viral Dialogue Dainik Gomantak
मनोरंजन

Jawan's Viral Dialogue : "मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल" 'जवान'चा डायलॉग व्हायरल नेटीजन्सना आठवले समीर वानखेडे

शाहरुखच्या जवानचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यातल्या डायलॉगची समीर वानखेडेंशी जोडला जात आहे..

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांनी आनंदाने एकच जल्लोष केला. ट्रेलरमधली शाहरुखची अॅक्शन आणि भन्नाट डायलॉग ऐकून चाहत्यांची प्रतिक्षा आणखी ताणली गेलीय.

गंमत म्हणजे जवानच्या ट्रेलरमधल्या एका डायलॉगमुळे शाहरुखसोबतच एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांचीही सोशल मिडीयावर चर्चा झाली.

'पठान'नंतर 'जवान'ची प्रतिक्षा

'पठाण'नंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एका बिग बजेट चित्रपटासह चाहत्यांच्या भेटीला 7 सप्टेंबरला येणार आहे. जवानची रिलीज डेट तोंडावर असताना आता ट्रेलर रिलीज झाला आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सध्या सोशल मिडीयावर शाहरुखच्या जवानची चर्चा हो आहे.

31 ऑगस्ट रोजी मोस्ट अवेटेड शाहरुखच्या जवानचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आणि काही तासातच त्याचे मिलियन व्ह्यूज मिळवले. अॅटली दिग्दर्शित शाहरुखच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. 'पठान'नंतर जवान हा शाहरुखसाठी खूप मोठा हिट ठरणार असल्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत.

शाहरुखचे 5 लूक्स

जवान चित्रपटात शाहरुख खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. तर नयनतारा एका पोलिस अधिकाऱ्याची भुमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि विजय सेतुपती देखील एका वेगळ्या लूकमध्ये दिसतोय.

चित्रपटाच्या कथेची कल्पना जरी ट्रेलर पाहिल्यानंतर येत नसली तरी हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे नक्की.

ट्रेलरची सुरुवात

जवानच्या ट्रेलरची सुरूवात एका जबरदस्त डायलॉगने होते. 'एक राजा था, भूखा-प्यासा घूम रहा था जंगल में...' हा डायलॉग ऐकू येतो आणि ट्रेलर सुरू होतो. जवानचा ट्रेलरचा एकुण वेळ 2 मिनिटे 45 इतका आहे. अॅक्शन, रोमान्स, सस्पेन्स, देशभक्तीने युक्त असणारा जवान ट्रेलर पाहता एक मोठा कमर्शिअल हिट ठरेल अशी शक्यता वाटते .

एकीकडे जवानच्या ट्रेलरची चर्चा सुरु असताना यातल्या एका डायलॉगची सध्या जोरदार चर्चा सुरू असुन या चर्चेचे केंद्र एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे आहेत.

त्याला कारण ठरला तो ट्रेलरमधील एक खतरनाक डायलॉग. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो की , 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...'. आता ट्विटवर हा डायलॉग खुपच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी हा संवाद मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी जोडला.

NCB माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग बस्ट प्रकरणात अटक केली होती. तेव्हा या प्रकरणाची खुप चर्चाही झाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता.

शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटातील अनेक धमाकेदार गाणीही रिलिज झाली. ज्यात शाहरुख खानसोबत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही हे पाहणे उत्सूकतेचे ठरेल.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT