Netflix Upcoming Series Dainik Gomantak
मनोरंजन

Netflix Upcoming Series : डेप वर्सेस हर्ड, द मंकी किंग.. नेटफ्लिक्सवर येतायत या नव्या सिरीज...जाणुन घ्या रिलीज डेट्स

नेटफ्लिक्सवर या आठवड्यात काही वेब सिरीज रिलीज होणार आहेत, चला पाहुया या नव्या सिरीज कोणत्या आहेत आणि त्या रिलीज कधी होणार आहेत?

Rahul sadolikar

या महिन्यात नेटफ्लिक्सवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. हॉलीवूडपासून ते कोरियन आणि हिंदी सिनेमापर्यंतचे लोकप्रिय प्रकल्प आहेत जे या महिन्यातच ऑगस्टमध्ये रिलीज होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया नेटफ्लिक्सच्या नवीन चित्रपट आणि वेब सिरीजची यादी.

या महिन्यात मनोरंजनाचा तडका

या महिन्यात अनेक चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर तुमची वाट पाहत आहेत. 'गदर 2' आणि OMG 2 सारख्या चित्रपटांनी चित्रपटगृहे गजबजली असताना, दुसरीकडे, अनेक मोठे चित्रपट आणि वेब सीरिज OTT वरही प्रदर्शित झाले आहेत. 

आम्‍ही तुम्‍हाला नेटफ्लिक्सवर ऑगस्ट 2023 मध्‍ये रिलीज होणार्‍या चित्रपट आणि सिरीजबद्दल . ज्यामध्ये 'डेप व्हर्सेस हर्ड', 'गन्स अँड रोझेस' सारखे मोठे प्रोजेक्टही आहेत. सगळ्यांच्या रिलीज डेट चला पाहुया.

डेप vs हर्ड

एम्मा कूपरने 'डेप व्हर्सेस हर्ड' या तीन भागांची माहितीपट मालिका दिग्दर्शित केली आहे. हा माहितीपट हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या केसवर आधारित आहे. ही मालिका 16 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित केली होईल.

द मंकी किंग

हा अँथनी स्टॅची दिग्दर्शित अॅनिमेटेड कल्पनारम्य अॅक्शन चित्रपट आहे. यात जिमी ओ. यांग आणि जोली होआंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

डेस्टिनेड विथ यू

या यादीत 'डेस्टिन्ड विथ यू' नावाचा एक कोरियन ड्रामा देखील आहे. या प्रेमकथेत रोवून हा मुख्य भूमिकेत आहे.  ही सीरीज 23 ऑगस्ट 2023 रोजी Netflix वर रिलीज होईल.

Ragnarok सीजन 3

नॉर्वेजियन काल्पनिक मालिका 'रॅगनारोक'चा तिसरा आणि शेवटचा सीझन 23 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यू आर नॉट इन्वायटेड टू माय बॅट मिट्झवाह

ही गोष्ट आहे दोन जिवलग मित्रांची. ज्याचे दिग्दर्शन सॅमी कोहेन यांनी केले आहे. ही सिरीज 25 ऑगस्ट रोजी रिलीज होईल.

वन पीस

या महिन्यात नेटफ्लिक्सवर 'वन पीस' ही जपानी मालिकाही प्रदर्शित होणार आहे, जी इचिरो ओडा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. ही मालिका ३१ ऑगस्ट रोजी प्रसारित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT