ED ANI
मनोरंजन

ED Raid: नेहा कक्कड, सनी लियॉनी सह अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या निशाण्यावर

दैनिक गोमन्तक

ED: महादेव बेटिंग अॅप संदर्भात ईडी छापेमारी सुरु केली आहे. यामध्ये अनेक बॉलीवूडचे दिग्गज कलाकार आणि गायकांचा समावेश असल्याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, ईडीने मुंबई,कोलकाता, भोपाळ राज्यात छापेमारी केली आहे. यामध्ये तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहीती समोर आली आहे. या सगळ्यामध्ये महादेव बेटिंग अॅप हे मुख्य सूत्रधाऱ मानले जात असून छत्तीसगडचे रहिवासी असणारे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ऍपचे प्रमोटर असून ते सध्या ईडीच्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलीवूडचे कलाकार ईडीच्या रडारवर

आता या प्रकरणात बॉलीवूडच्या प्रसिद्ध आणि दिग्गज गायक आणि कलाकारांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, राहत फतेह अली खान,विशाल ददलानी, अभिनेता टायगर श्रॉफ,नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांच्यासह बॉलीवूडमधील १४ कलाकार ईडीच्या रडारवर आहे.

योगेश पोपट नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून हवाला रैकेट चालवले जात असल्याचा दावा ईडीने आपल्या तपासात म्हटले आहे. गोविंद केडिया नावाच्या व्यक्तीच्या घरी १८ लाख रोख रक्कम आणि १३ कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ईडीला सापडले आहेत.

महादेव बेटिंग अॅपचे संस्थापकाने दुबई येथे ठेवलेल्या एका कार्यक्रमात हे सर्व कलाकार हजर होते. तेथील व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता तेव्हा ड्रग्ज तपासात अनेक बॉलीवूडचे अनेक कलाकारांचा समावेश होता. त्यावेळीदेखील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचे नाव समोर आले होते.

आता ईडीच्या रडारवर असलेल्या या कलाकारांचा समावेश बेटिंग प्रकरणात असणार का? ईडीच्या तपासात काय समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT