Nayanthara Dainik Gomantak
मनोरंजन

Nayanthara: नयनताराच्या 'अन्नपूरानी' चित्रपटाला हिंदूविरोधी म्हणत शिवसेनेच्या नेत्याने नोंदवली एफआयआर

Nayantara: चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध आणि नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एफआयआर नोंदवावी असे रमेश सोळंकी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Nayantara: शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी नयनतारा यांच्या अन्नपूराणी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या सिनेमात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे. निर्मात्यांनी भगवान रामाचा अपमान केला आहे. एवढेच नाही तर रमेश सोळंकी यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला 'हिंदूविरोधी' म्हटले आहे.

रमेश सोळंकी यांनी X हँडलवर दावा केला आहे की, नयनताराचा 'अन्नपूराणी' हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत आहे. त्यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध आणि नेटफ्लिक्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर एफआयआर नोंदवावी असे रमेश सोळंकी यांनी म्हटले आहे.

रमेश सोळंकी यांनी त्यांच्या तक्रारीची एक प्रतही शेअर केली आहे आणि त्यात नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओला टॅग केले आहे आणि ते म्हणाले की त्यांनी मुद्दाम हा चित्रपट प्राण प्रतिष्ठाभोवती हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी बनवला आहे. यासोबतच त्यांनी सरकार आणि पोलिसांना टॅग करत हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी प्रत्येकावर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT