Nawazuddin Siddiqui Custody Case Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui Custody Case: "नवाजुद्दीन सिद्दीकी हाजीर हो".. उच्च न्यायालयाचे कुटूंबियांसहित आजच हजर राहण्याचे आदेश

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या कुटूंबातील कलह आता कोर्टात पोहोचला असुन आज त्यावर सुनावणी होणार आहे.

Rahul sadolikar

Nawazuddin Siddiqui Custody Case: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची माजी पत्नी आलिया यांच्यातील मुलांच्या कस्टडीबाबत आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर नवाज आणि आलिया यांच्यातील वादग्रस्त खटल्याची सुनावणी सुरू आहे. 

30 मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने मुलांच्या भविष्याचा विचार करून हे प्रकरण इन-कॅमेरा निकाली काढायचे असल्याचे सांगितले होते.

30 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, "आम्ही मुलांसाठी चिंतित आहोत, त्यामुळे आम्ही हे प्रकरण शांततेने आणि सौहार्दपूर्णपणे सोडवण्याची शक्यता शोधत आहोत." सुनावणीदरम्यान खंडपीठाने नवाजुद्दीन, आलिया आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले.

दुसरीकडे, आलिया म्हणते की तिला कोणत्याही किंमतीत तिच्या मुलांचा ताबा घ्यायचा आहे. नवाजुद्दीनच्या वकिलाचे म्हणणे आहे की, त्यांनी आलियाला या खटल्याच्या निकालासाठी पत्रही पाठवले होते, परंतु तिथून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

नवाजुद्दीनने आलियाला सेटलमेंट लेटर पाठवले होते, मात्र असे असूनही हे प्रकरण सुटू शकले नाही. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, नवाजुद्दीनने अट घातली होती की, जर त्याला त्याच्या मुलांना भेटण्याची परवानगी दिली तर तो आलियाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेईल. यावर उत्तर देताना आलियाच्या वकिलाने सांगितले की, नवाज स्वतः आपल्या मुलांना भेटू इच्छित नाही, .

आलियाने नवाजच्या आईवर मारहाणीचा आरोप केल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे भांडण सुरू झाले. आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत.

आलियाने असेही सांगितले की, नवाजपासून घटस्फोटानंतरही दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि घटस्फोटानंतरच दुसरे अपत्य जन्माला आले, मात्र नवाजने कधीही तिचा आदर केला नाही. तर दुसरीकडे नवाजच्या आईने आलियावर आरोप करत दुसरे अपत्य नवाजचे नसून दुसऱ्याचे असल्याचे म्हटले आहे.

नवाजुद्दीनने काही दिवसांपूर्वी त्याचा भाऊ शमस सिद्दीकी आणि आलियाविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता. नवाजुद्दीनने आरोप केला आहे की, हे दोघे मिळून आपली प्रतिमा जनतेत डागाळत आहेत. 

याला उत्तर देताना त्याचा भाऊ शमास याने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितले की, या मानहानीच्या केसला आपण घाबरत नाही.

तिने सोशल मीडियावर लिहिले की, 'नवाजुद्दीनविरोधात खूप आधी आवाज उठवायला हवा होता. यामुळे माझी 11 वर्षे वाचली असती आणि मला शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला नसता. 

तो कर्मचाऱ्यांना मारहाण करायचा आणि मलाही मारहाण करायचा. शूटवर तीन-चार हजार लोकांसमोर सुपरवायझिंग प्रोड्युसरलाही मारहाण करण्यात आली. लवकरच हा व्हिडिओ सर्वांसमोर येणार आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT